Join us

जादा प्रवासी भराल, तर कोर्टात जाल; शेअर रिक्षाचालकांकडून नियमांचा भंग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 2:06 PM

शेअर रिक्षामधून सध्या सर्रास तीनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक सुरू आहे. वाहतूक पोलिस कारवाई करतात.

मुंबई :

शेअर रिक्षामधून सध्या सर्रास तीनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक सुरू आहे. वाहतूक पोलिस कारवाई करतात. जादा प्रवासी प्रकरणी २०० रुपयांपासून न्यायालयात जावे लागण्याची कारवाई होते. तरीही अशा प्रकारांना आळा बसलेला नाही.

मुंबईत शहरात सध्या पेट्रोल, एलपीजी, सीएनजीवर इंधनावर जवळपास दोन लाखांहून अधिक रिक्षा चालविल्या जातात. यात एलपीजवर चालणाऱ्या रिक्षा जास्त आहेत. सध्या इंधनाचे दर शंभर रुपयांच्या पुढे आहेत. 

२०० रुपयांप्रमाणे दंड आकारतात. रिक्षाचालकांची ओरड होतेय. पेट्रोल, एलपीजीचे दर वाढलेले असताना त्यावर कोणी बोलत नाही, व्यवसाय कसा करायचा असा सवाल  रिक्षाचालक करत आहेत.

पुन्हा कारवाई तीव्र होणारएकीकडे अपघातांची संख्या वाढत आहे. परिवहन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या नियमानुसार प्रवासी वाहतूक करणे गरजेचे असताना शेअर रिक्षाच्या नावाखाली तीनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक होते. अशावेळी वाहतूक शाखेकडून कारवाई केली जाते. मध्यंतरी शिथिल झालेली कारवाई पुन्हा तीव्र करण्याचे संकेत वाहतूक विभागाने दिले आहेत.तीन प्रवाशांचा परवाना असताना मधल्या आसनावर तीन जण, पुढे चालकाच्या दोन्ही बाजूने दोघे असे पाच जणांना घेऊन प्रवासी वाहतूक होते. ती रिक्षाचालक आणि प्रवाशांच्याही दृष्टीने धोक्याचे आहे. वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते. अशी वाहतूक जीवघेणीही ठरू शकते.- सुधीर शिंदे , प्रवासी

‘कारवाई कशी होईल’१५ ते २० रुपयांच्या प्रवासासाठी शेअर रिक्षाच्या नावाखाली रिक्षाचालकांना २०० रुपयांप्रमाणे दंड मोजावा लागतो. पोलिसांच्या मते नियमानुसार प्रवासी भरल्यास कारवाईला सामोरे जाण्याचा प्रश्नच येत नाही. तर रिक्षाचालक म्हणतात. पेट्रोलने १०० रुपये पार केले अशावेळी वाहतूक कशी करायची. दरवाढ केल्यानंतर गॅसही महाग होतो.

टॅग्स :ऑटो रिक्षा