मुंबई : रेल्वेतून रात्री प्रवास करताना मोठ्याने गप्पा मारल्या व मोठ्या आवाजात गाणी ऐकली, तर आता कारवाई करण्यात येणार आहे. जर तुमच्या सहप्रवाशाने झोपमोड झाल्याची तक्रार केली, तर तत्काळ कारवाई केली जाणार.बोगीमध्ये रात्री गोंगाट करणाऱ्यांवर रेल्वेतर्फे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसे नवे नियम रेल्वे मंत्रालयाकडून लागू करण्यात आले. प्रवाशांना आपल्या सवयी बदलाव्या लागणार आहेत. मोबाइलवर मोठ्याने बोलतात. मोठ्या आवाजात गाणे ऐकत असल्याच्या तक्रारी होत होत्या. रेल्वेचे कर्मचारी गस्तीदरम्यान मोठ्या आवाजात बोलतात, अशादेखील तक्रारी होत्या. यासाठी रेल्वे प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे.
काय आहेत रात्री १० नंतरचे नवे नियमnकोणताही प्रवासी मोठ्याने बोलू शकणार नाही व मोठ्या आवाजात गाणे ऐकू शकणार नाही.nसहप्रवाशाला झोपेचा त्रास होऊ नये, म्हणून रात्रीचे दिवे सोडून इतर सर्व दिवे बंद करावेच लागणार.nसहप्रवाशांच्या तक्रारीवरून रेल्वे प्रशासन कारवाई करू शकते.
रेल्वे पोलीस किंवा कर्मचाऱ्यांचाही गोंधळ चालणार नाहीरेल्वेच्या प्रवासादरम्यान रात्री रेल्वे पोलीस गस्तीवर असताना डब्यातच उभे राहून मोठमोठ्याने बोलतात. रेल्वे कर्मचाऱ्यांचाही गोंधळ त्या एक्स्प्रेसमध्ये दिसतो. आता त्यांचाही गोंधळ यात चालणार नाही.
रेल्वेतून प्रवासाकरिता स्वतंत्ररीत्या आरक्षण केले जाते. अधिकचे पैसे मोजावे लागतात. मात्र, रात्रीच्या वेळी मोबाइलवर किंवा आपसांत मोठ्याने बोलून झोपमोड करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्यावर नव्या निर्णयामुळे चाप बसेल.- सुजय मोरे, प्रवासी
लांबच्या प्रवासादरम्यान रात्रीच्या वेळी जेवण झाल्यानंतर अनेक जण झोप घेणे पसंत करतात. मात्र, सहप्रवाशांकडून बोगीतील दिवे सुरू ठेवणे, मोबाइलवर मोठ्याने बोलणे सुरू असते. यासाठी रेल्वे मंत्रालयाचा निर्णय योग्य आहे.- अमित गुरव, प्रवासी
सुरू असलेल्या रेल्वेnमुंबई – पुणे – मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेसnमुंबई – करमळी - मुंबई तेजस एक्स्प्रेसnमुंबई – पुणे - मुंबई डेक्कन एक्स्प्रेसnमुंबई - नांदेड तपोवन एक्स्प्रेसnमुंबई – जालना - मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसnमुंबई - कोल्हापूर कोयना एक्स्प्रेसnमुंबई - नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस