संजूबाबाविरुद्ध बोललास तर तुझे सुद्धा तुझ्या आईसारखे तुकडे करू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 02:52 PM2018-07-05T14:52:32+5:302018-07-05T14:53:39+5:30

१९९३ बॉम्बस्फोटातील पीडित तरुणाला आला जीवे मारण्याचा धमकीचा कॉल 

If you speak against Sanjubaba, you too will be like your mother | संजूबाबाविरुद्ध बोललास तर तुझे सुद्धा तुझ्या आईसारखे तुकडे करू

संजूबाबाविरुद्ध बोललास तर तुझे सुद्धा तुझ्या आईसारखे तुकडे करू

Next

 मुंबई - संजू सिनेमाविरोधात काल एका वृत्तवाहिनीने भरविलेल्या चर्चासत्रात १९९३ बॉम्बस्फोटातील पीडित तरुण तुषार देशमुखने अभिनेता संजय दत्तविरोधात टिप्पणी केली होती. त्यानंतर आज सकाळी ११. ४६ वाजता तुषारला आंतराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांकावरून जीवे मारण्याचा धमकीचा कॉल आला. याबाबत माहीम पोलीस ठाण्यात तुषारने तक्रार दाखल केली आहे. 

तुषार हा दादर येथे राहत असून तो हॉटेल व्यावसायिक आहे. त्याच्या वयाच्या लहानपणीच आईचा १९९३ बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. त्यामुळे संजू सिनेमात दाखविलेल्या उदात्तीकरणाबाबत काल एका वृत्तवाहिनीवर चर्चासत्रात तुषारला निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यात तुषारने संजय दत्तविरोधात टिप्पणी केली होती. त्यानंतर आज सकाळी ११. ४६ वाजता तुषारला एका निनावी आंतराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांकावरून जीवे मारण्याचा धमकी देणारा कॉल आला. तुषारला +४४७५३७३२१०१५ या क्रमांकावरून कॉल आला होता. 'संजूबाबा के खिलफा कुछ भी बोला तो, तेरे माँ जैसे तुकडे तेरे भी कर देंगे' अशी धमकी त्याला देण्यात आली. त्यावेळी तुषार हा हिंदुजा रुग्णालयात काही कारणास्तव असल्याने त्याला याबाबत माहिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी लागली. अगोदर तुषार तक्रार करण्यासाठी दादर पोलीस ठाण्यात गेला होता. मात्र, तेथील पोलिसांनी कॉल हिंदुजा रुग्णालयात असताना आल्याने माहीम पोलीस ठाण्यात पाठविले. माहिम पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. हॉटेल व्यावसायिक असलेल्या तुषारचा प्रथम पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. मात्र, वरिष्ठांच्या आदेशानंतर दखलपात्र गुन्हा दाखल करून तुषारचा जबाब नोंदविण्यात आला. 

Web Title: If you speak against Sanjubaba, you too will be like your mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.