कचरा इकडे तिकडे टाकाल तर 10 हजारांपर्यंत दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 09:55 AM2023-11-23T09:55:47+5:302023-11-23T09:56:08+5:30

कुठेही कचरा फेकताना तुम्ही सापडला, तर दंड भरायची तयारी ठेवा.

If you throw garbage here and there, fine up to 10 thousand | कचरा इकडे तिकडे टाकाल तर 10 हजारांपर्यंत दंड

कचरा इकडे तिकडे टाकाल तर 10 हजारांपर्यंत दंड

मुंबई 
गेटवेच्या समुद्रात भरभरून निर्माल्य टाकतानाचा एका व्यक्तीचा  व्हिडीओ सध्या चांगलाच  व्हायरल झाला आहे. या व्हिडीओचा आधार घेत पालिका आणि पोलिसांनी कचरा टाकणाऱ्या त्या माणसाला शोधून काढले. फक्त शोधून काढले, एवढेच नाही तर त्याला १० हजार रुपयांचा घसघशीत दंडही ठोठावला. त्यामुळे सावधान ! कुठेही कचरा फेकताना तुम्ही सापडला, तर दंड भरायची तयारी ठेवा.

२४ प्रकारची वर्गवारी
कोणत्या प्रकारचा कचरा टाकल्यास  किती दंड आहे, जाणून घ्यायचे आहे ? ... तब्बल २४ प्रकारची वर्गवारी असून १०० रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. फक्त तुम्हीच नाही तर तुमच्या पाळीव प्राण्यानेही घाण केल्यास त्याचाही दंड तुम्हाला भरावा लागू शकतो. ठरवून दिलेल्या ठिकाणांऐवजी अन्य ठिकाणी प्राणी-पक्षांना खाऊ घातल्यासही पैशाच्या स्वरुपात दंड भरावा लागू शकतो.

या प्रकारच्या कचऱ्याला इतक दंड
n कचरा कुठेही फेकणे २०० रु.
n थुंकणे २०० रु. 
n उघड्यावर आंघोळ  १०० रु.
n उघड्यावर लघवी २०० रु.
n उघड्यावर शौचास बसणे   १०० रु.
n प्राणी पक्ष्यांना खाऊ घालणे ५०० रु.
n रस्त्यावर वाहन धुणे १००० रु.
n भांडी- कपडे धुणे २०० रु.
n अंगण स्वच्छ न ठेवणे
अ) एकाच आवाराच्या मालकांसाठी १००० रु. ब) इतरांसाठी १०, ००० रु.

हा समज करून घेऊ नका 
फक्त कचरा करण्यासाठीच दंड आहे, असा समज अजिबात करून घेऊ नका. कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास बांधकाम-पाडकामाचा कचरा विभक्त करून न दिल्यास, कोंबड्या- मासळीचा कचरा वेगळा न केल्यास, सार्वजनिक मेळावे-कार्यक्रमानंतर २४ तासांत स्वच्छता न केल्यास अशा १५ प्रकारांसाठीही दंडाची तरतूद आहे. 

 

Web Title: If you throw garbage here and there, fine up to 10 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.