मुंबई: खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यात धमक दिसत नाही. ते राजे आहेत म्हणून त्यांना खासदारकी दिली. मात्र ते राजे असतील तर रयत दिसली पाहिजे ना आजूबाजूला. ती कुठे दिसत नाही, अशी टीका भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली होती.
छत्रपती संभाजीराजे यांच्यात धमक दिसत नाही. खासदारकीची मुदत संपत आली की आंदोलनाची, राजीनामा देईन, पक्ष काढेन अशी भाषा सुरु होते. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन आरक्षण मिळत नाही आणि असं पुढारी होत नसतात. राजे हे समाजानं म्हणावं लागतं. राजे फिरताहेत पण रयत दिसत नाही आजूबाजूला, असं नारायण राणे म्हणाले होते. नारायण राणे यांच्या या टीकेनंतर संभाजीराजे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
संभाजीराजे ट्विट करत म्हणाले की, छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकदच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही. त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
नेमकं राणे काय म्हणाले होते?-
ते राजे आहेत म्हणून त्यांना खासदारकी दिली. आता त्यांनी राजीनामा देऊ नये. मात्र, रायगडावर कोण आहेत हो? आंदोलन हे नेहमी लोकांमध्ये करावं. पण खासदारकी संपता संपता हे सगळे कसे आठवायला लागले. मला त्यांचा मुद्दा पटला तर मी जाईन. ते राजे असतील तर रयत दिसली पाहिजे ना आजूबाजूला. ती कुठे दिसत नाही. जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन कोणी नेता होत नाही. राणे म्हणाले, आंदोलन हे नेहमी लोकांमध्ये करावं. पण खासदारकी संपता संपता हे सगळे एकदम कसे आठवायला लागले. मला त्यांचा मुद्दा पटला तर मी जाईन. पण जनतेला वाटले पाहिजे की ते आपले राजे आहेत. पुण्यात नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
राणे यांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचावर टीका करताना राणे म्हणाले"मुख्यमंत्र्यांचा अभ्यास कुठे आहे हो ? ते साधा एक प्रस्ताव वाचू शकत नाहीत.तेवढा वेळ मिळाला नाही. ते उद्गार काढतात का ? मी इतके वर्ष त्यांचा बरोबर होतो ते कधी उद्गार काढताना दिसले नाहीत." कोरोनावरून देखील त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली."मुख्यमंत्र्यांना घरचा बाहेर येत नाही. आणि सगळं केंद्राने द्यावं असं म्हणत बसायचं. लस मिळाली नाही त्याला दोघे जबाबदार. पण राज्य सरकार ने प्रयत्न करायला पाहिजे. ग्लोबल टेंडर काढले. आणि त्याला १२% मागितले.त्या नंतर टेंडर रद्द झाले. " असं ते म्हणाले.