सह्याद्री अतिथीगृहावर RSS ने आयोजित केलेली इफ्तार पार्टी रद्द करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 07:33 AM2018-06-04T07:33:39+5:302018-06-04T07:34:18+5:30
सह्याद्री अतिथीगृह धार्मिक सोहळे साजरे करण्याची जागा नव्हे
मुंबई: रमजाननिमित्त राज्य शासनाच्या सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित करण्यात आलेली इफ्तार पार्टी वादात सापडण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुस्लीम शाखेतर्फे ही इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती. मात्र, मुंबईतील दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. सह्याद्री अतिथीगृह ही शासकीय मालमत्ता आहे. त्यामुळे याठिकाणी कोणत्याही सार्वजनिक किंवा धार्मिक कार्यक्रमांना अनुमती नाही. या वास्तूचा वापर केवळ शासकीय कार्यक्रमांसाठीच होणे अपेक्षित असल्याचे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता फडणवीस सरकार आणि RSS यावर काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
#Maharashtra: Two Mumbai-based activists have sought cancellation of an Iftar party organised by Muslim wing of Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) at the Sahyadri guest house, saying 'no public or religious functions are allowed inside the venue. It is meant for official use only'
— ANI (@ANI) June 4, 2018