Join us

एव्हढी अनभिज्ञता बरी नव्हे

By admin | Published: January 26, 2017 3:58 AM

सोशल नेटवर्किंग साइट्सवर, व्हॉट्सअ‍ॅपवर प्रजासत्ताक दिनानिमित्त पोस्टचा पाऊस पडतो. प्रजासत्ताक दिन का साजरा करतात?

पूजा दामले/स्नेहा मोरे / मुंबईसोशल नेटवर्किंग साइट्सवर, व्हॉट्सअ‍ॅपवर प्रजासत्ताक दिनानिमित्त पोस्टचा पाऊस पडतो. प्रजासत्ताक दिन का साजरा करतात? २६ जानेवारीला का? पहिले पंतप्रधान कोण? राष्ट्रपती कोण? या सर्व गोष्टींचा अभ्यास शाळेत केलेला असतो. या गोष्टी शाळेत पाठ केलेल्या असतात. त्यामुळे २६ जानेवारीच्या निमित्ताने ‘लोकमत’ने मुंबईकरांची चाचणी घेतली. अनेकांनी प्रश्न म्हटल्यावरच माघार घेतली. उशीर झालाय, लांब जायचे आहे, अशा सबबी देत पळ काढला. काही मुंबईकर थांबले, त्यांना सोपे प्रश्न विचारले. त्या वेळी मुंबईकर भांबावून गेले. माहीत आहे, पण आठवत नाही अथवा अत्यंत मजेशीर उत्तरे ऐकायला मिळाली. माहीत असणाऱ्या गोष्टीही ऐन वेळी न आठवल्याने अनेक जण हळहळले. काहींनी उत्तरे बरोबर दिली, तर काहींना देताच आली नाहीत. या माध्यमातून कुणाचीही चेष्टा करण्याचा उद्देश नाही.