Join us

पाणी चोरांकडे मनपा पुरवठा विभागाचे दुर्लक्ष

By admin | Published: June 28, 2014 11:35 PM

पाण्याचा अपव्यय टाळून पालिकेच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलेआह़े

भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी शहरांतील पाणी चोरीकडे एकीकडे दुर्लक्ष करून दुसरीकडे मात्र, याच विभागाचे कार्यकारी अधिकारी संदीप सोमाणी यांनी पाण्याचा अपव्यय टाळून पालिकेच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलेआह़े
महानगरपालिका स्टेम व मुंबई महानगरपालिकेकडून एकूण 1क्8 एमएलटी पाणी विकत घेते. त्यापैकी केवळ 3क् ते 4क् टक्के पाणीपट्टी वसुली केली जात आहे. इतर नागरिक पैसे भरत नसतानादेखील त्यांना निरंतर पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच पैसे न भरल्याने ज्यांच्या घरातील पाणीपुरवठा खंडित केला आहे अशा काही मालमत्ताधारकांनी अनधिकृतपणो नळजोडणी केली आहे. शहरांतील ब:याच अनधिकृत बांधकाम केलेल्या इमारतींचे कर मूल्यांकन झाले नसतानादेखील त्यामधील रहिवाशांना नियमित पाणीपुरवठा होत आहे. तसेच ब:याच सर्विस सेंटरमधील अवैध नळजोडणी खंडित करण्यात पाणीपुरवठा विभागास अपयश आले आहे. भूभाग लिपिक, सव्रेअर, उप अभियंता व कार्यकारी अभियंता हे अधिकारी -कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून आपली जबाबदारी एकमेकांच्या खांद्यावर टाकीत कामचुकारपणा करीत असल्याने पाणीचोरांचे चांगलेच फावले आहे. या पाणीचोरांवर पोलीस कारवाई करण्यास कोणीही अधिकारी पुढे येत नसल्याने अशा अधिकारी व कर्मचा:यांवर आयुक्त कोणती दंडनीय कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. शहरातील पाणी चोरांवर कारवाई झाल्यास पाण्याची गळती थांबून भिवंडीकरांना पाणीटंचाई भासणार नाही, अशी माहिती पालिका सूत्रने दिली.
स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन, इन्फ्रा प्रा.लि. व मुंबई महानगरपालिकेमार्फत शहरास होणा:या पाणीपुरवठय़ात 14 टक्के कपात केल्याने व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने शहरातील नागरिकांना दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. धरणातील पाणीसाठा कमी असल्याने उद्भवणा:या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी नागरिकांनी पाणी काटकसरीने व जपून वापरावे, वाहने धुण्यासाठी, बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये, पिण्याव्यतिरिक्त कपडे व भांडी धुण्याकरिता बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा, असे आवाहन मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोमाणी यांनी केले आहे. मात्र पालिकेमार्फत अनेक ठिकाणी खोदलेल्या बोअरवेल बंद स्थितीत आहेत. त्या सुरू करून पाणीचोरांवर कडक कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे.
 
च्सध्या पावसाने दडी मारल्याने शेतक:यांनी पेरलेली भाताची हवी तशी उगवण झाली नाही. त्यामुळे शेतक:यांचे नुकसान होणार आहे. याबाबत कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतक:यांना मदत मिळावी अशी मागणी जि़प़चे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी ठाणो जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल भेरे यांनी केली आहे.
च्शेतक:यांनी महागडी भात बियाणो घेऊन पेरण्या केल्या. परंतु, पावसाअभावी भातरोपे धोक्यात आल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. सर्वच शेतक:यांना पुन्हा बियाणो घेणो शक्य नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीचा विचार करून शेतक:यांना मोफत भात बियाणो व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.