आयआयटी प्रवेशप्रक्रिया आज सुरू होणार

By admin | Published: June 29, 2015 03:02 AM2015-06-29T03:02:41+5:302015-06-29T03:02:41+5:30

आयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) आणि एनआयटीमधील (नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांसाठीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात होत आहे.

The IIT admission process will begin today | आयआयटी प्रवेशप्रक्रिया आज सुरू होणार

आयआयटी प्रवेशप्रक्रिया आज सुरू होणार

Next

मुंबई : आयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) आणि एनआयटीमधील (नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांसाठीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात होत आहे. २९ जून ते ३ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रवेश पसंतीक्रम देता येणार आहे.
२६ जुलैपर्यंत चालणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेनंतर २७ जुलैला एनआयटी आणि आयआयटीच्या प्रिपरेटरी कोर्सची सुरुवात होणार आहे. दरम्यान, २ जुलैला मॉक सीट अ‍ॅलोकेशन आणि ४ जुलैला अ‍ॅलोकेशन प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या अनुक्रमे ५ जुलै, ११ जुलै, १६ जुलै आणि २१ जुलै मिळून एकूण चार फेऱ्या पार पडणार आहेत. तर प्रत्येक फेरीनंतर प्रवेश घेण्यास किमान चार दिवसांची मुदत मिळणार आहे. प्रवेश प्रक्रियेनंतर तत्काळ २१ जुलैला अभ्यासक्रमास सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The IIT admission process will begin today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.