आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांची अवकाश संशोधनात झेप, ‘व्योम-२’ या थ्रस्टरची पीएसएलव्ही मॉड्युलवर चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 15:22 IST2025-01-04T15:21:52+5:302025-01-04T15:22:25+5:30
आयआयटी, मुंबईचे माजी विद्यार्थी तुषार जाधव, अश्तेश कुमार यांच्या ‘मनस्तु स्पेस’ या स्टार्टअपने ही ग्रीन प्रोपल्शन सिस्टम तयार केली आहे. सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला पीओईएम-४ वर या ग्रीन प्रोपल्शन सिस्टम व्योम-२यूची चाचणी केली.

आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांची अवकाश संशोधनात झेप, ‘व्योम-२’ या थ्रस्टरची पीएसएलव्ही मॉड्युलवर चाचणी
मुंबई : आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्पेस टेकमधील ‘मनस्तु स्पेस’ या ‘स्टार्टअप’ने ‘व्योम-२यू’ या थ्रस्टरची यशस्वी चाचणी केली. पीएसएलव्ही ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्युल-४ (पीओईएम) वर ही चाचणी घेतली. त्यामुळे अवकाश संशोधनाला आणखी चालना मिळणार आहे.
आयआयटी, मुंबईचे माजी विद्यार्थी तुषार जाधव, अश्तेश कुमार यांच्या ‘मनस्तु स्पेस’ या स्टार्टअपने ही ग्रीन प्रोपल्शन सिस्टम तयार केली आहे. सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला पीओईएम-४ वर या ग्रीन प्रोपल्शन सिस्टम व्योम-२यूची चाचणी केली.
इस्त्रोच्या प्रयोगशाळा, स्टार्टअप शैक्षणिक संस्था प्रयोग करणार
- या चाचणीदरम्यान थ्रस्टरच्या ३० सेकंदांच्या फायरिंगने पीएसएलव्ही पीओईएम-४ प्लॅटफॉर्म २४ अंशांनी
झुकले. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवरील प्रणालीने अखंड नियंत्रण मिळवण्यापूर्वी त्याला ०.५ डिग्री प्रतिसेकंदाचा कोनीय वेग प्रदान केला.
- हा पीओईएम-४ प्लॅटफॉर्म ३५० किलोमीटरवर असलेल्या कक्षेत ठेवण्यात आला आहे. इस्रोच्या प्रयोगशाळा, स्टार्टअप आणि शैक्षणिक संस्था यावर आता प्रयोग करणार आहेत.