आयआयटी हेरिटेज फाउंडेशनकडून आयआयटी बॉम्बेला २. ३५ कोटींची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 07:03 PM2020-07-03T19:03:49+5:302020-07-03T19:04:16+5:30

आयआयटी बॉम्बेकडून होणार ५०० गरजू विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षणासाठी मदत

IIT Bombay from IIT Heritage Foundation 35 crore assistance | आयआयटी हेरिटेज फाउंडेशनकडून आयआयटी बॉम्बेला २. ३५ कोटींची मदत

आयआयटी हेरिटेज फाउंडेशनकडून आयआयटी बॉम्बेला २. ३५ कोटींची मदत

Next

मुंबई : मुंबई आणि राज्यातील कोरोनाची परिस्थिती व प्रादुर्भाव पाहता पुढील शैक्षणिक सत्र सुरु करण्यास आणखी उशीर न करता ते लवकरच सुरु करण्याचा आणि ते पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने चालविण्याचा निर्णय आयआयटी बॉम्बे प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी आयआयटी बॉम्बेला आयआयटी हेरिटेज फाउंडेशनकडून तब्ब्ल २. ३५ कोटी रुपयांची मदत करण्यात आली असून आता त्यामध्ये आता ५०० गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन संसाधने व सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. या मदतीमुळे आयआयटी बॉम्बेमधील हुशार विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणात अडथळा येणार नसल्याची माहिती आयआयटीकडून देण्यात आली.

आयआयटी बॉम्बेसारख्या संस्थेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान संस्थेला परवडणारे नाही. मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सध्यस्थितीत विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गावाहून बोलावणेआणि त्यांच्या शिकविण्या घेणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर आयआयटी सिनेट प्रशासनाने संपूर्ण शैक्षणिक सत्र ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील सत्राच्या ऑनलाईन शिवणीचे वर्ग  कधी आणि कसे सुरू होतील ? यबाबत विद्यार्थ्यांना लवकरच कळवले जाणार असल्याची माहिती सुभाशीष चौधरी यांनी दिली.

मात्र आयआयटीच्या सगळ्याच विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेससाठी आवश्यक संसाधनांचा खर्च पेलवणे शक्य नाही. अशा गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून आलेल्या विद्यार्थ्यांनासाठी निधी उभारण्याचे आवाहन संचालक शुभाशीष चौधरी यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत आयआयटी बॉम्बे हेरीटेज फाउंडेशनच्या अमेरिकेत स्थित सदस्यांनी आणि आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी ही मदत केली आहे. आयआयटी बॉम्बेकडून आता गरजू विद्यार्थ्यांसाठीचे निकष ठरविण्यात येतील आणि त्याप्रमाणे आवश्यक संसाधनांचे वाटप करण्यात येईल अशी माहिती आयआयटी बॉम्बे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अमेरिकेतील आमच्या माजी विद्यार्थ्यांकडून आत्ताच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेली ही मदत खूप आवश्यक आहे. कोरोना महामारीच्या काळातील या गरजू विद्यार्थ्यांसाठी हा मदतीचा हात उपयोगी ठरणार आहे. पैशांअभावी या हुशार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळा येऊ नये यासाठी आयआयटी बॉम्बे प्रशासन ५ कोटी निधीची उभारणी करत असून अद्याप ५० % निधी उभारणी बाकी आहे. मात्र ही मदत पाहून समाजातील अनेक संस्था आणि लोक पुढे येतील असा विश्वास आयआयटी बॉम्बेचे संचालक शुभाशीष चौधरी यांनी व्यक्त केला.

Web Title: IIT Bombay from IIT Heritage Foundation 35 crore assistance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.