मुंबई - उच्च शिक्षण देणाऱ्या आशिया खंडातील संस्थांची क्रमवारी (टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग) क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, तंत्रशिक्षण देणारी आयआयटी बॉम्बे ही संस्था जागतिक स्तरावर क्रमावारीत २६व्या स्थानावर तर भारतात दुस-या स्थानावर आहे. त्या आधी इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स या संस्थेने जागतिक क्रमवारीत १३वे तर भारतात पहिल्या स्थानावर येण्याचा मान मिळवला. वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँक या संस्थेतर्फे ही क्रमवारी जाहीर होते. या यादीत समावेश होण्यासाठी संस्थांना शैक्षणिक प्रतिष्ठा, कर्मचारी कौशल्य, विद्यार्थी संख्या, पीएचडी विभागातील शिक्षक, विभागानुसार संशोधन प्रबंध, आंतरराष्ट्रीय शिक्षक, विद्यार्थी असे निकष लावले जातात.
जागतिक स्तरावर आयआयटी बॉम्बेला स्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 4:56 AM