मुंबई : आयआयटी बॉम्बे या भारतातील प्रतिष्ठित शिक्षणसंस्थेने स्वातंत्र्यदिनी फेसबुक कव्हरवर ‘बनावट फोटो’ वापरल्याची सोशल मीडिया वापरकर्त्यांनी खिल्ली उडवली, तसेच जोरदार ट्रोलिंगही करण्यात आले. त्यानंतर संस्थेने स्पष्टीकरण जारी केले आहे.
आठवडाभरापूर्वी केंद्र सरकारच्या ‘घरोघरी तिरंगा’ या मोहिमेसाठी आयआयटी बॉम्बेच्या अधिकृत फेसबुक खात्यावरुन एक फोटो शेअर करण्यात आला होता. या कव्हर फोटोमध्ये आयआयटी बॉम्बेच्या मुख्य इमारतीवर तिरंगा फडकताना दाखवले होते. पण, फोटोत इमारतीवर तिरंगा ‘एडिट’ करुन लावण्यात आल्याचे स्पष्ट दिसत होते.
हा फोटो बघताच अनेक वापरकर्त्यांनी खिल्ली उडवली. यानंतर संस्थेनेही ताे फाेटाे खरा नव्हता, असे स्पष्टीकरण दिले आहे.