देशातील सर्वोत्तम संस्थांमध्ये आयआयटी मुंबई राज्यात अव्वल; यंदा कामगिरीचा आलेख उंचावला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 06:15 AM2020-06-12T06:15:31+5:302020-06-12T06:15:49+5:30

सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांची यादी जाहीर; मुंबई विद्यापीठाच्याही मानांकनात सुधारणा

IIT Mumbai tops the list of best institutions in the country; This year, the performance graph went up | देशातील सर्वोत्तम संस्थांमध्ये आयआयटी मुंबई राज्यात अव्वल; यंदा कामगिरीचा आलेख उंचावला

देशातील सर्वोत्तम संस्थांमध्ये आयआयटी मुंबई राज्यात अव्वल; यंदा कामगिरीचा आलेख उंचावला

Next

मुंबई : राष्ट्रीय संस्था मूल्यांकनाचे (एनआयआरएफ) रँकिंग गुरुवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाकडून जाहीर करण्यात आले. यात आयआयटी मुंबईने देशाच्या सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये चौथ्या (८०.७५) क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. मागील वर्षी ही संस्था चौथ्या क्रमांकावरच असली तरी यंदा तिच्या गुणांकात भर पडली आहे. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाने १९वे स्थान (५८.७७) पटकाविले आहे. इंजिनीअरिंगमध्ये आयआयटी मद्रास प्रथम स्थानी आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च या पुण्याच्या संस्थेने २५वे (५५.४३), मुंबईच्या होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटने ३०वे (५३.२०) तर मुंबईच्याच इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजीने ३४वे (५१.७०) स्थान पटकाविले आहे. सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत पहिल्या १०० संस्थांमध्ये महाराष्ट्राच्या ११ शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. देशातील उच्च शिक्षण संस्थांचे मानांकन नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ)ने गुरुवारी देशभरातील संस्थांची क्रमवारी आॅनलाइन जाहीर केली. केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाने हे रँकिंग जाहीर केले आहे. विविध विभागनिहाय अशा ११ क्षेत्रात ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.

यंदा प्रथमच दंत (डेंटल अभ्यासक्रम) याचाही समावेश करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या मानांकनात मागील वर्षीच्या तुलनेने सुधारणा झाली असून यंदा मुंबई विद्यापीठाने ६५वे स्थान मिळविले. मागील वर्षी सर्वोत्तम विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठ ८१व्या स्थानावर होते. अभियांत्रिकी संस्थांच्या क्रमवारीत महाराष्ट्रात मुंबईच्या आयआयटी मुंबईनेच ८५.०८ गुणांची कमाई करत प्रथम स्थान, तर देशात तिसरे स्थान मिळविले. आयसीटीने अभियांत्रिकी क्षेत्रात राज्यात ५८.७० गुण मिळवून दुसरे, तर नागपूरच्या विसवेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थेने राज्यात अभियांत्रिकी क्रमवारीत तिसरे स्थान मिळविले आहे.

Web Title: IIT Mumbai tops the list of best institutions in the country; This year, the performance graph went up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.