Join us

‘आयआयटीयन्स’च्या वेतनात वाढ

By admin | Published: March 18, 2017 2:13 AM

आयआयटीमधील जे. मेहता स्कूल आॅफ मॅनेजमेंटच्या २०१८ च्या इंटर्नशीप प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वेतनात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मुंबई : आयआयटीमधील जे. मेहता स्कूल आॅफ मॅनेजमेंटच्या २०१८ च्या इंटर्नशीप प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वेतनात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या प्रक्रियेत इंटर्नशीप मिळालेल्या विद्यार्थ्याला महिना २.८० लाख इतके वेतन मिळाले आहे. यंदाच्या प्रक्रियेत वेतन सरासरी १.१९ लाख रुपये असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २७ टक्क्यांची वाढ झाल्याचे आयआयटीकडून सांगण्यात आले. या प्रक्रियेत ४० कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या प्रक्रियेत मॅनेजमेंट कॅटच्या परीक्षेत ९८.३ टक्के मिळवलेल्या विद्यार्थ्याचाही समावेश आहे. या प्रक्रियेत एफएमजीसी कंपन्यांनी २९ टक्के विद्यार्थ्यांना आॅफर दिल्या आहेत. या पाठोपाठ आयटी आणि कन्सल्ंिटग कंपन्यांतून २२ टक्के विद्यार्थ्यांना इंटर्नशीप मिळाल्या आहेत. उत्पादन आणि बीएफएसआय या क्षेत्रातही विद्यार्थ्यांना इंटर्नशीप मिळाली आहे. (प्रतिनिधी)