लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आपले पर्यावरण, जैवविविधता या गोष्टींना आपण सहज विसरून जातो. आपण आपल्या रोजच्या व्यस्त कामातून वेळ काढून, पर्यावरण आणि जैवविविधता कशी जपता येईल, यासाठी प्रयत्न करायला हवेत. आपण पर्यावरणावर अवलंबून आहोत. आपण आपली इको सिस्टीम चांगली ठेवली, तर आपले आयुष्य चांगले होणार आहे. ही गोष्ट लेखिका प्रेरणा सिंग बिंद्रा यांच्या पुस्तकातून त्यांनी मांडली आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री दिया मिर्झा हिने केले.बीएनएचएस हॉर्नबिल हाउस येथे प्रेरणा सिंग बिंद्रा यांच्या दी वॅनिशिंग : इंडियाज वाइल्डलाइफ क्रायसिस’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान दिया मिर्झा बोलत होती. अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी हेदेखील उपस्थित होते. दिया मिर्झा, लेखिका प्रेरणा सिंग बिंद्रा व प्रवीण परदेशी यांनी पुस्तकाचे अभिवाचन केले.
‘इको सिस्टीम चांगली ठेवली, तर आयुष्य चांगले जगू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 1:20 AM