बेकायदा बांधकामांची तक्रार आॅनलाइन

By admin | Published: February 20, 2016 02:25 AM2016-02-20T02:25:42+5:302016-02-20T02:25:42+5:30

महिलांना सॅनेटरी नॅपकीन मोफत देण्याच्या योजनेचे श्रेय भाजपाने एकट्यानेच लाटल्यामुळे नाराज शिवसेनेने आज स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन एका उपक्रमाची घोषणा केली़

Illegal construction complaint online | बेकायदा बांधकामांची तक्रार आॅनलाइन

बेकायदा बांधकामांची तक्रार आॅनलाइन

Next

मुंबई : महिलांना सॅनेटरी नॅपकीन मोफत देण्याच्या योजनेचे श्रेय भाजपाने एकट्यानेच लाटल्यामुळे नाराज शिवसेनेने आज स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन एका उपक्रमाची घोषणा केली़ बेकायदा बांधकामाची तक्रार आॅनलाइन करण्याची गेली वर्षे रखडलेल्या प्रकल्पाची घोषणा खासदार राहुल शेवाळे यांनी आज महापौर निवासस्थानी घाईघाईने केली़ आता http://www.removalofencroachment.com या संकेतस्थळावरून नागरिकांना तक्रार दाखल करता येणार आहे.
महिलांना सॅनेटरी नॅपकीन मोफत देण्याची योजना राहुल शेवाळे यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाच्या कारर्कीदीच्या वेळी जाहीर केली होती़ मात्र ती प्रत्यक्ष अमलात आली नाही़ भाजपाने पालिका शाळांमधील विद्यार्थिनींसाठी ही सुविधा सुरू करीत शिवसेनेवर कुरघोडी केली.
भाजपाच्या या खेळीमुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने एकला चालो रेचा मार्ग स्वीकारला. अनधिकृत बांधकामांसंबंधी अँड्रॉइड अ‍ॅप्लिकेशन सुरू करीत असल्याचेही शेवाळे यांनी जाहीर केले.
बेकायदा बांधकामाची तक्रार करण्यासाठी यापूर्वी लेखी तक्रारशिवाय पर्याय नव्हता़ पालिकेच्या हेल्पलाइनवर ही तक्रार करावी लागत होती़ तसेच या तक्रारीनुसार कारवाई झाली का याचा पाठपुरावा करण्यासाठी संबंधित व्यक्तीलाच पालिकेचे उंबरठे झिजवावे लागत होते़ यावर उपाय म्हणून अखेर आॅनलाइन तक्रार पद्धत सुरू करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)पोलिसांचेही सहकार्य
बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे़ यासाठी या संकेतस्थळाशी पोलिसांनाही जोडण्यात येणार आहे़ एवढेच नव्हे तर गुगल मॅपवरही बेकायदा बांधकामाची माहिती उपलब्ध होणार आहेक़ारवाईची सूचना तक्रारदाराला
तक्रारदाराने आॅनलाइन तक्रार केल्यानंतर त्याची माहिती आयुक्तांबरोबच सर्व संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल़ तसेच तक्रारीवर कोणती कारवाई झाली याची माहितीही तक्रारदारला मिळू शकेल़ या संकेतस्थळामुळे बेकायदा बांधकामांना आळा बसेल, असा विश्वास महापौर स्नेहल आंबेकर यांनी व्यक्त केलाख़ंडणीखोर तक्रारदारांना चाप
मुंबईत अनेक खंडणीखोर तक्रारदार आहेत़ पालिकेत तक्रार नोंदवून खंडणी उकळण्याचे प्रकार सुरू असतात़ अशा खंडणीखोरांनाही या संकेतस्थळामुळे चाप बसणार आहे़ यासाठी तक्रार करण्यापूर्वी आधार कार्ड क्रमांक व इतर माहिती नमूद करावी लागणार आहे़ त्यामुळे एकच व्यक्ती विविध भागांतील बेकायदा बांधकामांची वारंवार तक्रार करीत असेल तर अशांचा बंदोबस्तही करणे शक्य होईल, असे शेवाळे यांनी सांगितले़तक्रारीची दखल घ्यावीच लागणार
आॅनलाइन तक्रार आल्यानंतर त्यावर प्रभागातील कनिष्ठ अभियंत्यांना दिलेल्या मुदतीत कारवाई करणे क्रमप्राप्त आहे़ त्याचा अहवाल आॅनलाइन नमूद करण्याबरोबरच तक्रारदारलाही द्यावा लागणार आहे़ दिलेल्या मुदतीत तक्रारीची दखल घेऊन कारवाई न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे़

Web Title: Illegal construction complaint online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.