मतदानाच्या पूर्व रात्री खार येथे अवैध दारू व रोकड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 06:57 PM2024-05-20T18:57:59+5:302024-05-20T18:57:59+5:30

आचारसंहिता भंगाच्या घटना टाळण्यासाठी भरारी पथक प्रमुख जय शहा, डॉ. शार्दूल गांगण तसेच विनोद निकम यांच्या पथकांनी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ - १७६ यांच्या हद्दीत रविवारी दोन कारवाया केल्या.

Illegal liquor and cash seized at Khar on the eve of polling | मतदानाच्या पूर्व रात्री खार येथे अवैध दारू व रोकड जप्त

मतदानाच्या पूर्व रात्री खार येथे अवैध दारू व रोकड जप्त

श्रीकांत जाधव 

मुंबई : निवडणुकीच्या पूर्व रात्री निवडणूक आयोगाच्या वेगवेगळ्या पथकाने वांद्रे पूर्व परिसरात केलेल्या कारवाईत अवैध दारू साठा आणि रोकड जप्त केली. त्यात आत्तापर्यंत एकूण ६७ लाख ४५ हजार ३९० रुपये एवढी बेहिशोबी रोकड पकडली, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी दिली.

आचारसंहिता भंगाच्या घटना टाळण्यासाठी भरारी पथक प्रमुख जय शहा, डॉ. शार्दूल गांगण तसेच विनोद निकम यांच्या पथकांनी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ - १७६ यांच्या हद्दीत रविवारी दोन कारवाया केल्या. यामध्ये रात्री खार पूर्व स्टेशन जवळच्या एका गोडाऊनमध्ये अवैध दारू साठ्यावर पथकाने छापा मारला. या कारवाईत शंभर  अवैध दारूच्या बाटल्याचा साठा जप्त करण्यात आल्या आहे. तसेच पुढील कार्यवाहीसाठी निर्मलनगर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

- २ लाख रोकड जप्त

तसेच दुसऱ्या एका घटनेत भरारी पथकाने पहाटे तीन वाजता वांद्रे पूर्व येथील वाहन  तपासणी नाक्यावर तपासणीत एका दुचाकीमध्ये २ लाख रोकड रक्कम आढळून आली. दुचाकीच्या मालकाने भरारी पथकाला बघून पळ काढला. त्यानंतर दुचाकी व रोकड निर्मलनगर पोलीस स्टेशन येथे जप्त करण्यात आलेली आहे. 

Web Title: Illegal liquor and cash seized at Khar on the eve of polling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.