विनामळ क्षेत्रात बेकायदा खाणकाम
By Admin | Published: April 24, 2016 12:28 AM2016-04-24T00:28:41+5:302016-04-24T00:28:41+5:30
प्रस्तावित अंतरराष्ट्रीय विमानळाच्या मुख्य क्षेत्रात मोठ्याप्रामणात बेकायदा खाणकाम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणाची सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा
नवी मुंबई : प्रस्तावित अंतरराष्ट्रीय विमानळाच्या मुख्य क्षेत्रात मोठ्याप्रामणात बेकायदा खाणकाम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणाची सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी गंभीर दखल घेतली असून संबधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश संबधित विभागाला दिले आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या कामाचा व्ही. राधा यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष आढावा घेतला. त्यानुसार त्यांनी प्रस्तावित पुष्पकनगर येथील पुनर्वसन व पुन:स्थापन क्षेत्रांना व विमानतळ प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रात भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी पारगाव, डुंगी, कोहली आणि कोपर या भागांना भेट दिली असता या परिसरात मोठ्याप्रमाणात बेकायदेशीर खाणकामे सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार संबधित खाण चालकांवर स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश संबधित विभागाला दिले आहेत. यासंदर्भातील अहवालाची प्रत रायगडचे जिल्हाधिकारी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष व जेएनपीटीचे अध्यक्ष आदींना पाठविण्याच्या सुचना त्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, व्ही. राधा यांनी यावेळी उलवे नोडमधील वहाळ येथील पुनर्वसन व पुन:स्थापनासाठी वहाळ येथील सेक्टर २४, २५ व २६ येथे सुरु असलेल्या जमिन विकास कार्यांचा आढावा घेतला. सेक्टर २४ मधील ५० टक्के विकास कार्य पूर्ण झाले आहे. कंटेनर परिसरामध्ये जवळजवळ १६ हेक्टर क्षेत्रावर अनधिकृत बांधकामांचा विकास झाल्यामुळे सेक्टर २५ अ मध्ये जमिन विकास कार्य हाती घेण्यात आले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या समस्येमुळे आतापर्यंत केवळ ३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन झाले आहे. तसेच कंटेनर परिसर क्षेत्र वगळता सेक्टर २५ व २५-अ भागांतील जमिनीचे ८० टक्के विकास कार्य पूर्ण झाले आहे. व्ही. राधा यांनी याप्रसंगी पुष्पक नगर येथे आतापर्यंत झालेले विकास कार्य व समस्यांचा आढावा घेतला. १९ हेक्टर जमिनीवर विकास कार्य करण्यात येणार आहे. यापैकी ७५ हेक्टर जमिनीचे विकास कार्य पूर्ण झाले आहे. अंदाजे १२ हेक्टर भागातील जमिनी अविकसित आहे. कारण यासाठी गावकऱ्यांचा विरोध व वन विभागाकडून लवकरच २२.५४९ हेक्टर जमिनीसाठी परवानगी मिळणार आहे. व्ही राधा यांनी यावेळी
करंजडे, वडघर या भागातील पायाभूत सुविधांच्या विकास कार्यांचाही यावेळी राधा यांनी आढावा
घेतला. (प्रतिनिधी)