मुंबई-अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी वाहनांच्या बेकायदा पार्किंग आणि बेकायदा बॅनरबाबतठोस कारवाई केली आहे. तसेच फूटपाथ आणि रस्त्यांवरील बेकायदेशीर पार्किंगच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. मात्र पालिकेच्या विशेषत: घनकचरा व्यवस्थापन विभागाशी संबंधित असलेली वाहने या नियमांचे उल्लंघन करत आहे.परिणामी अंधेरी-कुर्ला रोडवर बेकायदेशीरपणे पार्क केलेल्या पालिकेच्या वाहनांमुळे अस्वच्छता पसरली असल्याची माहिती वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त अॅड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी लोकमतला दिली.
आज सकाळी के पूर्व विभागाच्या अख्यारितीत अंधेरी कुर्ला रोडवरील जे.बी. नगर मेट्रो स्टेशनजवळ पालिकेचे ट्रक आणि व्हॅन बेकायदेशीरपणे पार्क केली होती.ज्यामुळे रस्त्यावरील गळतीमुळे अस्वच्छ आणि अस्वच्छ वातावरण निर्माण झाले होते. परिणामी सार्वजनिक आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
पालिका प्रशासनाने वाहने सामान्य नागरिकांवर वाहने पार्किंग करण्यासाठी जे नियम लावतात तसेच समान नियम पालिकेच्या पार्किंग केलेल्या वाहनांसाठी देखिल लावण्यात यावे अशी आग्रही मागणी अॅड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी पालिका आयुक्त डॉ.इकबाल सिंह चहल यांच्या कडे इमेल द्वारे केली केली असून इमेलची प्रत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.