सोशल मीडियाच्या माध्यमातून होतेय कासवांची अवैध विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 05:18 AM2018-05-24T05:18:46+5:302018-05-24T05:18:46+5:30
गैरप्रकार : मागील दोन वर्षांत ६८ कासवांची सुटका
मुंबई : अलीकडच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून कासवांची अवैध विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तस्करी करण्यामध्ये तरुणाईचा समावेश जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. कासव पाळल्यामुळे घरात सुख-शांती-समृद्धी नांदते, अशी भावना अनेकांच्या मनात रुजली आहे. याच अंधश्रद्धेपोटी घरात कासव पाळले जाते. त्यामुळे कासवांच्या अवैध विक्रीत वाढ झाली आहे.
मागील दोन वर्षांत तब्बल ६८ कासवांची अवैध विक्री होण्यापासून रोखण्यात यश आले आहे. यात स्टार प्रजातीचे कासव हस्तगत करून प्लॅन्ट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटीच्या वतीने त्यांची सुरक्षित स्थळी रवानगी करण्यात आली. सोशल मीडियामार्फत कासवांची खरेदी-विक्री सुरू असते. यात तरुण मुलांचा समावेश असतो. समुद्रकिनाऱ्यावरून लहान कासव पकडून १५० ते २०० रुपयांना त्याची विक्री करण्यात येते. याला आळा बसविण्यासाठी पर्यावरणप्रेमी, वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा आणि वनविभागाकडून एकत्रितरीत्या कारवाई करण्यात आली. आरोपींकडून दंड वसूल करण्यात आला; आणि काही जणांवर कारवाई सुरू आहे, अशी माहिती पर्यावरणप्रेमी सुनिश
कुंजू यांनी दिली. अंद्धश्रद्धेमुळे कासवांच्या प्रजाती धोक्यात आल्या आहेत. पर्यावरणाचा ºहास आणि वाढता प्लॅस्टिक कचरा यामुळे कासवांचे जीवन विस्कळीत झाले आहे. स्टार कासव, इंडियन रुफ कासव, इंडियन टेन्ट कासव, स्पॉटेन्ड सॉफ्ट शेल्ड कासव, इंडियन रिव्हर टेरेपिन कासव या कासव प्रजातींची अवैध विक्री जास्त होते, असेही कुंजू यांनी सांगतिले. जाळे सक्रीय सोशल मीडियामार्फत कासवांची खरेदी-विक्री सुरू असते. यात तरुण मुलांचा समावेश असतो. समुद्रकिनाºयावरून लहान कासव पकडून १५० ते २०० रुपयांना त्याची विक्री करण्यात येते.
कायद्याची तरतूद
वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत कलम ९, ३९, ४० (२), ४९ ब खाली गुन्हा दाखल होतो. कोणत्याही प्राण्याची किंवा पक्ष्याची शिकार करणे, पाळणे अथवा त्यांचे कवच, कातडी खरेदी-विक्री केल्यास एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा आणि दंड आकारण्याची तरतूद आहे. वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत ‘शेड्युल ४’नुसार स्टार कासव प्रजाती संरक्षित करण्यात आली आहे.
(मागील दोन वर्षांत मुक्त केलेल्या कासवांची आकडेवारी
ठिकाण कासवांची संख्या आणि जात
वांद्रे- ६ स्टार कासव
शीव- १२ स्टार कासव
ऐरोली- २४ स्टार कासव
चेंबूर- ६ स्टार कासव
मानसरोवर- १ स्टार कासव
डॉकयार्ड रोड- २ स्टार कासव
दिवा- २ स्टार कासव
कॉफर्ड मार्केट- ९ स्टार कासव
आणि ६ इंडियन रुफ कासव