मुलुंड येथे ३१ लाखांचा अवैध विदेशी दारूचा साठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 10:28 PM2024-01-18T22:28:13+5:302024-01-18T22:28:27+5:30
Mumbai: गोवा राज्यातील स्वस्त विदेशी दारु अवैध वाहतूक करून मुंबईत विक्रीस आणलेल्या टोळीवर मुंबई उपनगरे, उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचुन कारवाई केली. या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाने ४ आरोपी आणि ३१ लाख ५२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
-श्रीकांत जाधव
मुंबई - गोवा राज्यातील स्वस्त विदेशी दारु अवैध वाहतूक करून मुंबईत विक्रीस आणलेल्या टोळीवर मुंबई उपनगरे, उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचुन कारवाई केली. या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाने ४ आरोपी आणि ३१ लाख ५२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक - २, मुंबई उपनगरे यांना गोवा राज्यात विक्रीस असलेला मद्यसाठा मुलुंडकडून मुंबईकडे वाहतूक होणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पाळत ठेवण्यात आली. त्यात एक चारचाकी वाहन व ट्रक अशा वाहनाच्या माध्यमातून ही अवैध दारूची वाहतूक होणार होती. त्यावर कारवाई करीत मुंबई उपनगरे उत्पादन शुल्क विभागाने ४ आरोपीना ताब्यात घेतले असून १७६४ ब.लिटर विदेशी मद्य साठा आणि चारचाकी वाहन, आयशर ट्रक असा ३१ लाख ५२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उत्पादन शुल्क विभाग मुंबई उपनगर अधीक्षक नितीन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर 'एम' विभाग निरीक्षक विनय शिर्के, दु. निरीक्षक धोंडगे, सुतार तसेच निरीक्षक के विभाग कर्मचारी यांनी संयुक्तपणे ही कार्यवाही केली.
-----------------