Join us  

स्टेशनची  चित्तरकथा - दोन जंक्शनना जोडलेले स्टेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 1:08 PM

दररोज या ठिकाणाहून मुंबई आणि पनवेलकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्याही लक्षणीय आहे.

वसई-दिवा-पनवेल-रोहा मार्गावरील निळजे हे महत्त्वाचे स्थानक. मध्यवर्ती असे म्हटले तरी चालेल. या स्थानकापासून घेसर, वडवली, हेदुटणे, घारिवली, उसरघर, संदप, भोपर, दावडी ही कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिकांच्या सीमारेषांवर वसलेली छोटी छोटी गावे जवळ आहेत. निळजे स्थानक कोपर आणि दिवा या दोन जंक्शन स्थानकांशी जोडलेले असल्याने या स्थानकावरील वर्दळ लक्षणीय असते. 

दररोज या ठिकाणाहून मुंबई आणि पनवेलकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्याही लक्षणीय आहे. या स्थानकाचे ठिकाण लक्षात घेऊन आजूबाजूच्या परिसरात मोठमोठी निवासी संकुले आता आकार घेऊ लागली आहेत. निळजे स्थानकात तीन फलाट आहेत. कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या येथून जातात. तसेच दिवा-वसई आणि दिवा-पनवेल या येथील मुख्य गाड्या आहेत. या ठिकाणाहून मुंबई, पनवेल तसेच पश्चिम रेल्वेवरील महत्त्वाची ठिकाणेही गाठता येतात. निळजे स्थानकावरून कल्याण डोंबिवली परिवहन सेवेची बसही उपलब्ध आहे. तसेच येथून घणसोली या स्थानकाकडेही जाता येते. 

नव्याने निर्माण होणाऱ्या निवासी संकुलांमुळे निळजे स्थानक परिसरात आता चांगली वर्दळ वाढू लागली आहे. येथून पनवेल आणि खारघर ही महत्त्वाची ठिकाणेही जवळ आहेत तसेच तळोजा हा औद्योगिक परिसरही नजीकच आहे. 

 

टॅग्स :मुंबईरेल्वे