'घटनादुरुस्ती ऐवजी 'बदल' हा शब्द निघाला असेल, मी खेद व्यक्त करतो'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 12:54 PM2020-10-19T12:54:46+5:302020-10-19T12:55:28+5:30

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण तापलं आहे. मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली.

'I'm sorry if the word' change 'came out instead of' correction ', sambhajiraje bhosale | 'घटनादुरुस्ती ऐवजी 'बदल' हा शब्द निघाला असेल, मी खेद व्यक्त करतो'

'घटनादुरुस्ती ऐवजी 'बदल' हा शब्द निघाला असेल, मी खेद व्यक्त करतो'

googlenewsNext
ठळक मुद्देघटना दुरुस्ती ऐवजी बदला हा शब्द निघाला असावा, पत्रकारांनी माझी मूळ भावना समजून न घेता, चुकीच्या पद्धतीने बातम्या लावल्या. त्यामुळे, लोकांच्या भावना दुखावल्या, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो, असे संभाजीराजेंनी म्हटलंय.

मुंबई - छत्रपती संभाजीराजेंनी गरज पडल्यास मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारकडेही मदत मागण्याची तयारी दर्शवली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी, केंद्र सरकारची काही मुव्हमेंट असेल, उदा- घटना बदल करायची असेल तर त्या दृष्टीनेही माझा अभ्यास सुरू आहे, असे संभाजीराजेंनी म्हटल्याचे वृत्त माध्यमांत झळकले. त्यानंतर, अनेकांनी या वक्तव्यावरुन नाराजी व्यक्त केली. त्यानंतर, माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचे संभाजीराजेंनी म्हटले आहे. तसेच, मला घटनादुरुस्ती असे म्हणायचे होते, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण तापलं आहे. मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली. या मोर्चात खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार ओमराजे निंबाळकर सहभागी झाले होते. त्यावेळी आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका, संयम कधी सोडायचा माहीत आहे, पण गरज पडेल, त्यावेळी तलवारी काढू, असा इशारा देत आम्ही भिकारी नाही तर हक्क मागत आहोत, अशा शब्दांत संभाजीराजेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता. आता, गरज पडल्यास केंद्र सरकारच्या मुव्हमेंटने घटना बदल करण्याच्या दृष्टीने माझा अभ्यास सुरू असल्याचं संभाजीराजेंनी म्हटंल होतं. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणीसाठी गेले असताना, पत्रकारांनी मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंना प्रश्न विचारले होते. मात्र, मला तसं म्हणायचं नव्हत, असे स्पष्टीकरण संभाजीराजेंनी दिलंय. 


 
मला माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा बातम्या दिसत आहेत, मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी घटना दुरुस्ती करण्यासंबंधी अभ्यास करणार आहे, मला हे वाक्य बोलायचे होते. चुकून बोलण्याच्या ओघात, घटना दुरुस्ती ऐवजी बदला हा शब्द निघाला असावा, पत्रकारांनी माझी मूळ भावना समजून न घेता, चुकीच्या पद्धतीने बातम्या लावल्या. त्यामुळे, लोकांच्या भावना दुखावल्या, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो, असे संभाजीराजेंनी म्हटलंय. मराठा आरक्षणाबाबत संसदेत घटनादुरुस्ती हाही पर्याय होऊ शकतो, असे विद्वान सांगत आहेत, आणि मी त्याचा अभ्यास करुन पावले उचलणार आहे, असेही संभाजीराजेंनी म्हटलंय.

काय म्हणाले होते संभाजीराजे

“मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे. आपण एसईबीसी हा कायदा तयार केला आहे. मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचं मागासवर्गीय आयोगने म्हटलं आहे, त्यामुळे ते सिद्ध झालं आहे. दरम्यान विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या कायद्याला मंजुरी दिली आहे. तो पारित झाला असून हायकोर्टानेही त्याला मान्यता दिली आहे. तरीही मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर केंद्र सरकारची काही मुव्हमेंट असेल उदा. घटना बदल करायची असेल तर त्या दृष्टीनेही माझा अभ्यास सुरु आहे. घटना बदल केल्यास तो विषय देशासाठीच लागू होईल” असंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं होतं.

Web Title: 'I'm sorry if the word' change 'came out instead of' correction ', sambhajiraje bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.