मुंबई : दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणा-या नेपियन्सी मार्गावरील उड्डाणपुलास ब-याच ठिकाणी तडा गेला आहे़ त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून सिमेंट काँक्रीटमधील लोखंडी सळ्या गंजल्या आहेत़ परिणामी वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे़प्रियदर्शनी पार्क येथील हा उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम खात्याने ४० ते ४५ वर्षांपूर्वी बांधला होता़ या पुलाच्या एका बाजूस प्रियदर्शनी पार्क आणि रस्त्यावर पादचारी व वाहनांची रहदारी असल्यामुळे या पुलावर प्रचंड गर्दी असते़ तर दुसऱ्या पदपथावर बेकायदा बांधकामाचा वेढा आहे़ अशा पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याचे पाहणीदरम्यान आढळून आले़ त्यानुसार पालिकेने तांत्रिक सल्लागाराची नेमणूक केली होती़ या सल्लागाराने सदर पुलाच्या सुरक्षित वापरासाठी पुलाच्या दुरुस्तीचे उपाय सुचविले आहेत. पुलाच्या बेअरिंग जागेवरून सरकल्या व वाकल्या तर पुलाचे सांधे नादुरुस्त असल्याचे या कंपनीने निदर्शनास आणले आहे़ त्यानुसार या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून यासाठी तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे़ याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला आहे़ (प्रतिनिधी)
दक्षिण मुंबईत महत्त्वाच्या पुलाची तातडीने दुरुस्ती
By admin | Published: January 13, 2015 1:25 AM