Join us

कर्जखाते असलेल्या बँकेत तातडीने आधार क्रमांक द्या - सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 2:58 AM

कर्जखाते असलेल्या बँकेला शेतक-यांनी तात्काळ आधार क्रमांक द्यावा, आपला आधार नंबर कर्जखात्याशी नोंद करुन घ्या, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी केले.

मुंबई : कर्जखाते असलेल्या बँकेला शेतक-यांनी तात्काळ आधार क्रमांक द्यावा, आपला आधार नंबर कर्जखात्याशी नोंद करुन घ्या, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी केले.देशमुख म्हणाले, सर्व कर्जदार शेतकºयांची माहिती बँकेकडून मागविण्यात आली आहे, मात्र काही बँकांनी शेतकºयांचे आधार क्रमांक नोंद नसल्यामुळे माहिती देण्यास विलंब होत असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी सर्व शेतकºयांनी बँक व संबंधित संस्थेत तात्काळ आपला आधार क्रमांक नोंद करावा आणि बँकेनेसुद्धा शेतकºयांच्या आधार क्रमांकांची नोंद घेऊन कर्जमाफीसाठी लागणारी सर्व अचूक माहिती शासनाला वेळेत द्यावी, अशा सूचना बँकांना केल्या.महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित, मुंबई येथे राष्ट्रीयकृत बँका व खासगी बँकाची कर्जमाफीसंदर्भात शेतकºयांची आॅनलाईन माहिती संकलनाबाबत सहकार विभागाची आढावा बैठक झाली. सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधू, बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.बैठकीत बँकांकडून येणाºया माहितीच्या अडचणी संदर्भात चर्चा झाली. एकूण ३३ पैकी २७ बँकांनी ५० टक्क्यांपेक्षा जास्त माहिती बँकस्तरावर भरण्यात आल्याचे सांगितले. मात्र काही शेतकºयांचे आधार क्रमांक नसल्यामुळे संपूर्ण माहिती देण्यास विलंब होत असल्याचे बँकांनी सांगितले आहे.

टॅग्स :सुभाष देशमुख