राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. आज रात्री ८ वाजल्यापासून नव्या निर्बंधांच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. मुंबईत गेल्या वर्षी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीनं आता पुन्हा रुग्णवाढीचा वेग धरला आहे. त्यामुळे प्रशासनासमोरही चिंता निर्माण होऊ लागली आहे.
रिक्षा-टॅक्सीसह बस आणि लोकल प्रवासासाठी नेमका नियम काय?
आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावी येथील 18 वर्षांवरील सर्वांचे कोरोना लसीकरण करावे, अशी लेखी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. (Immediately Vaccinate Everyone Above 18 Years Of Age In Dharavi Demand by Shiv Sena MP Rahul Shewale)
काय म्हणाले राहुल शेवाळे?"गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. मात्र, नागरिकांची स्वयंशिस्त, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या एकत्रित प्रयत्नांमुळे धारावीकरांनी कोरोनावर मात करून एक अनोखं सकारात्मक उदाहरण जगासमोर ठेवलं होतं. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. धारावीत बहुसंख्य नागरिक हे आरोग्य आणि सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत धारावीतील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस दिल्यास मोठ्या संकटापासून धारावी आणि मुंबई वाचू शकेल", असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सातत्यानं रुग्णवाढ होताना दिसत आहे. मुंबईत दिवसाला सरासरी ८ हजार नवे रुग्ण सापडत आहेत. त्यात धारावीतही रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे महापालिका देखील सतर्क झाली आहे. ठिकठिकाणी रॅपिड अँटिजन टेस्ट घेतल्या आहेत.
राजेश टोपे यांनही केली होती मागणीराज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही याआधीच केंद्र सरकारकडे सर्व वयोगटातील लोकांना लसीकरणाची परवानगी देण्याचा विचार करण्यासंदर्भातील भूमिका मांडली आहे. अमेरिका, ब्रिटनसारख्या विकसीत देशांनी १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना विरोधी लस घेण्याची परवानगी दिलेली आहे. याच वयोगटातील तरुण मंडळी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असतात त्यामुळे महाराष्ट्रात सर्व वयोगटातील लोकांना लसीकरण करण्याची परवानगी केंद्रानं द्यायला हवी, असं राजेश टोपे म्हणाले होते.