मुंबई : अवघी मुंबापुरी श्रींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी, आता अवघ्या काही दिवस शिल्लक आहेत. लालबागसह दादरसह इतर बाजारपेठांमधील खरेदीचा उत्साह ओसंडून वाहत असून अवघी मुंबापुरी श्रीगणेशाच्या भक्तिरसात तल्लीन झाली आहे. असे असतानाच, तरुणाईने मुंबईकरांना ‘इकोफ्रेंडली’ गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.मुंबई महापालिकेसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेदेखील या कामी पुढाकार घेत, मुंबापुरीत जागोजागी जनजागृती फलक दर्शवित, मुंबईकरांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. शाडूच्या मातीची मूर्ती विराजमान करण्यापासून, पर्यावरणस्नेही साहित्य वापराचे आवाहन तरुणाईने केले आहे. संबंधित प्राधिकरणाने पुढाकार घेत, जनजागृती करावी, असे म्हणणे तरुणाईने मांडले असून, विसर्जनासाठी कृत्रिम तलावांवर भर द्यावा आणि ध्वनिप्रदूषण कमी करावे, असे प्रांजळ मत तरुणांचे आहे. मागील तीनएक वर्षांपासून गणेशोत्सवाला आलेले पर्यावरणस्नेही स्वरूप कायम टिकवून ठेवण्यास याची सुरुवात स्वत:पासून करावी, असे म्हणणे तरुणाईचे असून, या कामी मुंबईकरांनी पुढाकार घ्यावा, असे म्हणत, यंदाचा गणेशोत्सव ‘इकोफ्रेंडली’ साजरा झाला पाहिजे, यावर भर देण्यात आला आहे. मुंबई महापालिका, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या कामी मदत केल्यास, साहजिकच पर्यावरण टिकेल आणि पर्यावरणस्नेही उत्सवही साजरा होईल, असा तरुणाईचा सूर आहे.(संकलन - विक्की मोरे/प्रशांत कांबळे)काळानुसार सार्वजनिक गणेशोत्सवात बदल करायला हवेत. पर्यावरणावर दुष्परिणाम होणार नाहीत; याची काळजी घ्यायला हवी. पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करुन पर्यावरणाचा ºहास टाळावा. - प्रथमेश देसाईपर्यावरणपुरक गणेशोत्सव हे काळाची गरज आहे. सण हे पर्यावरणाला साजेसे असायला हवेत. सजावटीसाठी पर्यावरणस्नेही साहित्याचा वापर करावा. मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे. - कपिल घायवटपर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने पर्यावरणपुरक गणोशोत्सवाचा पुरस्कार केला पाहीजे. यासाठी सरकारनेही वेळोवेळी लोकांना मार्गदर्शन क रुन गणेश मंडळांसाठी मार्गदर्शनाच्या कार्यशाळा सुरु कराव्यात.- खुशाल देसाईप्लास्टर आॅफ पॅरीसचा वापर न करता शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्तीचा वापर केला पाहिजे. त्यामुळे जलपषदूण होणार नाही. मखरामध्ये प्लॅस्टिक आणि थर्माकॉलसारख्या पर्यावरण घातक वस्तूचा वापर टाळला पाहिजे. ध्वनीक्षेपकचा वापर न करता पारंपारिक वाद्यांचा वापर केला पाहिजे. मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात केले पाहिजे.- भूषण दोंडायचेकरगणेशोत्सवासाठी प्लास्टर आॅफ पॅरीस, प्लास्टिक आणि थर्माकॉल वापरू नये. पर्यावरणस्नेही साहित्याचा वापर करावा. प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी.- अनुज दोशीपर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी अधिकाधिक जनजागृती करण्याची गरज आहे. असे केले तरच आपले पर्यावरण उत्तम राहील.- श्रेयस जोशीगणेशोत्सवात प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी. पर्यावरणपूरक उत्सव साजरे करण्यावर भर द्यावा. आजारी व्यक्तींना ध्वनीप्रदूषणाचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.- अमोल गायकवाडनिसर्गला महत्त्व द्यावे. निसर्ग जपावा. पर्यावरणस्नेही साहित्यांनी उत्सव साजरा करावा. प्रदूषण होईल अथवा वाढेल अशा गोष्टी टाळाव्यात. - वर्षा ठाकुरपर्यावरणाच्या दृष्टीने इकोफ्रेंडली मूर्ती हा पर्याय उत्तम पर्याय असून, या मातीचा पुन्हा वापर करता येईल. परिणामी प्रदूषण होणार नाही.- राहूल डोगंरेवाढते जलप्रदूषण आणि ध्वनीप्रदूषणाचा विचार करता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला पाहिजे. ध्वनीप्रदूषण टाळले पाहिजे. पारंपारिक वाद्यांचा वापर केला पाहिजे.- गोविंद पाटीलइकोफ्रेंडली गणेशोत्सव ही संकल्पना नागरिकांना समजली पाहिजे. किंवा समजावून सांगितली पाहिजे. तेव्हा प्रदूषण कमी होईल. उत्सवासाठी पारंपारिक वाद्यांचा वापर केला पाहिजे.- सुशील लोंढेथर्माकोल आणि पीओपीचा वापर करता कामा नाये. सजावटीसाठी पर्यावरणस्नेही साहित्याचा वापर केला पाहिजे. तेव्हा पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा होईल.- आदित्य माळकरगणेशोत्सवादरम्यान पर्यावरणाची हानी होणार नाही; याची खबरदारी घेतली पाहिजे. जनजागृती केली पाहिजे. यंत्रणांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. जाणीव महत्त्वाची आहे. असे झाले तर उत्सव पर्यावरणस्नेही साजरे होतील.- ऋती कुलकर्णीपर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या तर प्रदूषणात वाढ होणार नाही. यासाठी अधिकाधिक जनजागृती होणे गरजेचे असून, सर्व यंत्रणांनी यासाठी पुढे येण्याची गरज आहे.- राम साबळेइकोफ्रेंडली गणेश मूर्तीची संख्या वाढली पाहिजे. अधिकाधिक पर्यावरणस्नेही उत्सव साजरा झाला पाहिजे.- पल्लवी कुलकर्णीगणेशमूर्ती इकोफ्रेंडली असली पाहिजे. यावर अधिकाधिक भर दिला पाहिजे. सर्वांनीच पुढाकार घेतला तर पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा होईल.- सपंदा सावंतइकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करणे ही काळाची गरज आहे. तरूण पिढीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. निर्सगाचा विचार करून इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करणे गरजेचे आहे.- विशाल कचरेपर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. त्यामुळे पर्यावरणाचा विचार करुन उत्सव साजरे करावेत.- आकाश साळवेसुरुवात आपल्यापासूनच करण्याची गरज आहे. अधिकाधिक पर्यावरणस्नेही साहित्याचा वापर करत गणेशोत्सव साजरा केला पाहिजे. परिणामी पर्यावरणाची हानी टळण्यास मदत होईल.- सुनीता गायकवाड