लाडक्या गणरायाचे गृहनिर्माण सोसायट्यांच्या कुंडांमध्येच विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 01:33 AM2020-08-29T01:33:39+5:302020-08-29T01:34:29+5:30

मुंबई शहरासह उपनगरात सर्वत्र विसर्जनासाठी कृत्रिम तलावांवर भर देण्यात आला. मुंबईत कृत्रिम तलावांसह नैसर्गिक स्थळी विसर्जन सुरू असले तरी येथे पोलिसांचा बंदोबस्त होता.

Immersion of Ladakya Ganarayya in the ponds of housing societies | लाडक्या गणरायाचे गृहनिर्माण सोसायट्यांच्या कुंडांमध्येच विसर्जन

लाडक्या गणरायाचे गृहनिर्माण सोसायट्यांच्या कुंडांमध्येच विसर्जन

Next

मुंबई : श्री गणेशाची मनोभावे सेवा केल्यानंतर शुक्रवारी मुंबईकरांनी गणपतीच्या मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. विशेषत: कोरोनामुळे मोठ्या संख्येने विसर्जनस्थळी जाण्यास मज्जाव असल्याने गणेशभक्तांनी आपल्या सोसायट्यांच्या कुंडांमध्ये, कृत्रिम तलावांत विसर्जन करीत आणखी एक नवा आदर्श घालून दिला.

मुंबई शहरासह उपनगरात सर्वत्र विसर्जनासाठी कृत्रिम तलावांवर भर देण्यात आला. मुंबईत कृत्रिम तलावांसह नैसर्गिक स्थळी विसर्जन सुरू असले तरी येथे पोलिसांचा बंदोबस्त होता. जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. कोणत्याच गणेशभक्तास विसर्जनस्थळी आत सोडले जात नव्हते. विसर्जनस्थळी आरती झाल्यानंतर जीवरक्षक जर्मन तराफ्यांच्या मदतीने मूर्तींचे विसर्जन करीत होते. फोर्ट, लालबाग, दादर, सायन, चेंबूर, कुर्ला, दहिसर, अंधेरी, विलेपार्ले, पवईसह लगतच्या सर्व परिसरांत मोठ्या प्रमाणावर कृत्रिम तलावांत विसर्जन करण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी दुपारपासून विसर्जन सुरू असतानाच पावसानेही आपला मारा कायम ठेवला होता. दुपारपासून सुरू झालेला पाऊस सायंकाळसह रात्री उशिरापर्यंत कोसळत होता.

महापौरांचे आवाहन
सातरस्ता विभागातील हेरंब हाइट्समधील रहिवाशांनी आपल्या गणपतीचे विसर्जन सोसायटीमधील कुंडामध्येच करून आदर्श निर्माण केला आहे. गणपतीच्या उर्वरित कालावधीत होणारे गणेश विसर्जनसुद्धा या पद्धतीनेच करून सहकार्य करावे, असे आवाहन महापौर पेडणेकर यांनी केले आहे.

Web Title: Immersion of Ladakya Ganarayya in the ponds of housing societies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.