Join us

लाडक्या गणरायाचे गृहनिर्माण सोसायट्यांच्या कुंडांमध्येच विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 1:33 AM

मुंबई शहरासह उपनगरात सर्वत्र विसर्जनासाठी कृत्रिम तलावांवर भर देण्यात आला. मुंबईत कृत्रिम तलावांसह नैसर्गिक स्थळी विसर्जन सुरू असले तरी येथे पोलिसांचा बंदोबस्त होता.

मुंबई : श्री गणेशाची मनोभावे सेवा केल्यानंतर शुक्रवारी मुंबईकरांनी गणपतीच्या मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. विशेषत: कोरोनामुळे मोठ्या संख्येने विसर्जनस्थळी जाण्यास मज्जाव असल्याने गणेशभक्तांनी आपल्या सोसायट्यांच्या कुंडांमध्ये, कृत्रिम तलावांत विसर्जन करीत आणखी एक नवा आदर्श घालून दिला.

मुंबई शहरासह उपनगरात सर्वत्र विसर्जनासाठी कृत्रिम तलावांवर भर देण्यात आला. मुंबईत कृत्रिम तलावांसह नैसर्गिक स्थळी विसर्जन सुरू असले तरी येथे पोलिसांचा बंदोबस्त होता. जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. कोणत्याच गणेशभक्तास विसर्जनस्थळी आत सोडले जात नव्हते. विसर्जनस्थळी आरती झाल्यानंतर जीवरक्षक जर्मन तराफ्यांच्या मदतीने मूर्तींचे विसर्जन करीत होते. फोर्ट, लालबाग, दादर, सायन, चेंबूर, कुर्ला, दहिसर, अंधेरी, विलेपार्ले, पवईसह लगतच्या सर्व परिसरांत मोठ्या प्रमाणावर कृत्रिम तलावांत विसर्जन करण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी दुपारपासून विसर्जन सुरू असतानाच पावसानेही आपला मारा कायम ठेवला होता. दुपारपासून सुरू झालेला पाऊस सायंकाळसह रात्री उशिरापर्यंत कोसळत होता.महापौरांचे आवाहनसातरस्ता विभागातील हेरंब हाइट्समधील रहिवाशांनी आपल्या गणपतीचे विसर्जन सोसायटीमधील कुंडामध्येच करून आदर्श निर्माण केला आहे. गणपतीच्या उर्वरित कालावधीत होणारे गणेश विसर्जनसुद्धा या पद्धतीनेच करून सहकार्य करावे, असे आवाहन महापौर पेडणेकर यांनी केले आहे.

टॅग्स :गणेशोत्सव