पहाटेपर्यंत गणेशाचा जयजयकार..! रविवारी सकाळी ७ पर्यंत ८० हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 12:01 PM2023-09-25T12:01:06+5:302023-09-25T12:01:32+5:30

यंदा गणेशोत्सवात गौरी गणपतीचे विसर्जन पाचव्या दिवशीच झाल्यामुळे विसर्जन केलेल्या मूर्तींची संख्या वाढली.

Immersion of more than 80 thousand idols till 7 am on Sunday | पहाटेपर्यंत गणेशाचा जयजयकार..! रविवारी सकाळी ७ पर्यंत ८० हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

पहाटेपर्यंत गणेशाचा जयजयकार..! रविवारी सकाळी ७ पर्यंत ८० हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

googlenewsNext

मुंबई

यंदा गणेशोत्सवात गौरी गणपतीचे विसर्जन पाचव्या दिवशीच झाल्यामुळे विसर्जन केलेल्या मूर्तींची संख्या वाढली. रविवारी पहाटेपर्यंत संपूर्ण मुंबईत तब्बल ८१ हजार ५७० गौरी व गणपती मूर्तींचे विसर्जन झाले. यापैकी ३२ हजार मूर्तींचे म्हणजे ४० टक्के मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. 
गेल्या वर्षी पाचव्या आणि सहाव्या दिवसांच्या एकूण ७९ हजार ४०४ मूर्तींसह गौरींचे विसर्जन झाले होते. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत पाच दिवस आणि गौरी गणपतीच्या मूर्तीमध्ये यंदा सुमारे २,०८६ ने वाढ झाली.  

यंदाच्या गणेशोत्सवात कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्यात आली आहे. यंदा मुंबईत ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळांची व्यवस्था आहे, तसेच विसर्जनासाठी १९१ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. दरवर्षी पालिका विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करीत असते. मात्र, या तलावांना गणेशभक्तांकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. टाळेबंदी व कोरोनाच्या काळात मात्र कृत्रिम तलावातच विसर्जन करणे बंधनकारक करण्यात आले. त्यामुळे 
कृत्रिम तलावांची संख्याही मुंबईत वाढविण्यात आली होती व त्यामध्ये मोठ्या संख्येने मूर्तींचे विसर्जन झाले होते. 

भक्तांचा मिळाला प्रतिसाद
यंदाही पालिकेने मोठ्या संख्येने कृत्रिम तलाव तयार केले आहेत. पर्यावरणाचा विचार करता गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले होते. त्याला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. रविवारी पहाटे ७ वाजेपर्यंत एकूण ८१,५७० गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. यामध्ये ७२ हजार ३६७ घरगुती, ७ हजार ७७१ गौरी, तर १ हजार ४३२ सार्वजनिक गणपतींचेही विसर्जन झाले. त्यापैकी कृत्रिम तलावात ३२,७१९ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यात २९,७९२ घरगुती, २३२९ गौरी, तर ५९८ सार्वजनिक गणेश मूर्तींचा समावेश होता. 

 

Web Title: Immersion of more than 80 thousand idols till 7 am on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.