Join us

विसर्जन मिरवणूक :आवाजाने केली पुन्हा ‘शंभरी’पार ,आवाज ‘सहनशक्ती’पेक्षा जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 3:04 AM

राज्यात शांतता क्षेत्राची बंधने लागू करणाºया उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे मुंबईसह राज्यभर मंगळवारी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाला लाऊडस्पीकर आणि ढोल-ताशांच्या गजरात दणक्यात निरोप दिला.

मुंबई : राज्यात शांतता क्षेत्राची बंधने लागू करणाºया उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे मुंबईसह राज्यभर मंगळवारी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाला लाऊडस्पीकर आणि ढोल-ताशांच्या गजरात दणक्यात निरोप दिला. मात्र विसर्जन मिरवणुकांमध्ये डेसिबलचा काटा पुन्हा शंभरीपार गेला. शहरातील काही मिरवणुकांमध्ये तर डेसिबलचा काटा ११०च्याही पुढे गेल्याचे आवाज फाउंडेशनने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.सांताक्रुझ पोलीस स्टेशनसमोर चाललेल्या मिरवणुकीत सर्वांत जास्त आवाजाची नोंद करण्यात आली. येथील मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशांसह हातोडीच्या साहाय्याने घंटा वाजविली जात असल्याने येथे ११९.८ डेसिबल एवढ्या आवाजाची नोंद झाल्याचे आवाज फाउंडेशनकडून सांगण्यात आले आहे.जागतिक आरोग्य संघटनेनुसार मनुष्यप्राणी ८० ते ८५ डेसिबलपर्यंत आवाज सहन करू शकतो. मात्र तो आवाजही फार वेळ ऐकावा लागला तर त्याचा त्रास सहन होण्यापलीकडे असतो. तसे झाल्यास लोकांची चिडचिड होणे, डोकेदुखीसारखी समस्या उद्भवते, असे आवाज फाउंडेशनच्या सुमैरा अब्दुलाली यांनी सांगितले.रुग्णालय परिसरातही आवाजाची ‘सेंच्युरी’सांताक्रुझ येथील आशा पारेख रुग्णालय परिसरात दिवसभरात अनेक विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या. सर्व मिरवणुकांदरम्यान आवाज १०० डेसिबलपेक्षा जास्त होता. ग्रँट रोड येथील ब्रीच कँडी रुग्णालयाजवळील मिरवणुकांदरम्यान आवाज ९९.८ डेसिबल इतका नोंदविण्यात आला.गणपती विसर्जनादरम्यानचा आवाज-