अडीच दिवसांच्या गणरायाचे विसर्जन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 11:17 PM2019-09-05T23:17:40+5:302019-09-05T23:18:13+5:30
पर्यावरण व नैसर्गिक स्त्रोतांचे संवर्धन व्हावे या भावनेने सहयोग यूथ फाऊंडेशनच्या संकल्पनेने गणपती विसर्जनासाठी मानविनर्मित तळे
तलासरी : अडीच दिवसांच्या गणरायाचे बुधवारी भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. तलासरी तीळ कुरझे धरण, वेरोली नदी येथे ५३ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. मात्र, विसर्जनावेळी पावसाने जोरदार सुरुवात केल्याने गणेश भक्ताच्या आनंदावर विरजण पडले. परिसरात पडणाऱ्या संततधार पावसाने नदी नाल्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. यामुळे विसर्जन करताना भक्तांना सावधानता बाळगावी लागली.
पर्यावरण व नैसर्गिक स्त्रोतांचे संवर्धन व्हावे या भावनेने सहयोग यूथ फाऊंडेशनच्या संकल्पनेने गणपती विसर्जनासाठी मानविनर्मित तळे (आर्टिफिशियल पॉण्ड) बोईसर येथील खैरेपाडा मैदानावर तयार करून तेथे दीड व अडीच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विसर्जन केल्यामुळे नैसर्गिक स्त्रोत खराब होऊ नये या दृष्टीकोनाने हा इको फ्रेंडली गणपती विसर्जन कार्यक्रम तरु ण वर्गाकडून हाती घेण्यात आला होता त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.