महापालिकेच्या अर्थसंकल्पावर दिसणार निवडणुकांचा प्रभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 05:25 AM2019-01-21T05:25:00+5:302019-01-21T05:25:13+5:30

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा प्रभाव पालिकेच्या सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पावर असणार आहे.

 Impact of Elections to be seen on municipal budget | महापालिकेच्या अर्थसंकल्पावर दिसणार निवडणुकांचा प्रभाव

महापालिकेच्या अर्थसंकल्पावर दिसणार निवडणुकांचा प्रभाव

Next

मुंबई : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा प्रभाव पालिकेच्या सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पावर असणार आहे. त्यामुळे कोणतीही नवीन करवाढ न लादता महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर भर देणारा हा अर्थसंकल्प असेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाबरोबरच विकास आराखड्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीवर भर, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता, सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्र या प्रकल्पांसाठी अधिक तरतूद असणार आहे.
पालिकेचा आगामी अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर होणार आहे. येत्या काही महिन्यांमध्ये लोकसभा व त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुका असल्याने, या अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच या अर्थसंकल्पातून करवाढ न करण्याचा संकल्प सत्ताधारी शिवसेना करेल. मात्र, वास्तवदर्शी अर्थसंकल्प सादर करण्यास आयुक्त अजय मेहता यांनी सुरुवात केल्याने त्याचाच प्रभाव या अर्थसंकल्पात दिसून येण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत नवीन प्रकल्पांची घोषणा करण्याऐवजी हाती घेतलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यानुसार, येत्या चार ते पाच वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित असलेल्या प्रकल्पांनाच गती मिळणार आहे. यामध्ये कोस्टल रोड, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता या प्रकल्पांबरोबरच देवनार येथे वीजप्रकल्प, अग्निशमन दलाला बळकटी देण्यावर भर असेल.
>विकासकामांवर ३७ टक्के खर्च
सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षातील तरतुदींतून केवळ ३६.७४ टक्के रक्कम ३१ डिसेंबरपर्यंत विकासकामांवर खर्च झाली आहे. त्यामुळे उर्वरित तीन महिन्यांमध्ये विकास कामांचा बार उडविण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरु होणार आहे.
>विभागवार खर्चाचा तपशील (टक्केवारी)
विभाग २०१८ २०१७
पर्जन्यजल वाहिन्या ८९.४४ ७०.९०
माहिती तंत्रज्ञान ६५.६३ १६.६५
रस्ते व वाहतूक ५१.४० ६२.५५
पूल ३९.८ ५७.९
घनकचरा व्यवस्थापन २२.८ १९.०१
अग्निशमन दल २६.३ २२.०१
>अर्थसंकल्पात तरतूद
केलेली रक्कम
वर्ष रक्कम
२०१८-१९ २५ हजार १४१ कोटी
२०१७-१८ २७ हजार २५८ कोटी
>पाच वर्षांतील खर्च
(३१ डिसेंबरपर्यंत)
वर्ष विकास कामांवर
खर्च (टक्केवारी)
२०१४ २५.६३
२०१५ २३.२४
२०१६ १६.८१
२०१७ ३१.०१
२०१८ ३६.७४

Web Title:  Impact of Elections to be seen on municipal budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.