Join us  

गळतीमुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम

By admin | Published: April 24, 2015 11:08 PM

पूर्वी उपप्रदेशातील शहरी भागांना उसगांव व पेल्हार धरणे, शिरवली बंधारा, पांढरतारा बंधारा यामधून पाणीपुरवठा करण्यात येत होता.

दिपक मोहिते, वसईपूर्वी उपप्रदेशातील शहरी भागांना उसगांव व पेल्हार धरणे, शिरवली बंधारा, पांढरतारा बंधारा यामधून पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु कालांतराने पाणी अपुरे पडू लागल्यामुळे शासनाने सूर्या प्रकल्प कार्यान्वित केला. मात्र गळती आणि खंडित वीज पुरवठ्यामुळे आजही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही.वसई विरारमध्ये मागील काही वर्षांत लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. बोरीवली-विरार रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण, मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे सहापदरीकरण, चर्चगेट-डहाणू दरम्यान उपनगरीय लोकल सेवा व अल्पदरात मिळणाऱ्या सदनीका असे विविध कारणे आहेत. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला.उपप्रदेशामध्ये विविध विकासकामे मार्गी लागल्यामुळे मुंबई-ठाणे परिसरातील नागरिकांचे या भागामध्ये स्थलांतर वाढले आहे. सध्या उपप्रदेशाची लोकसंख्या सुमारे १६ ते १७ लाखाच्या घरात पोहोचली आहे. अशाही परिस्थितीमध्ये महानगरपालिका प्रशासनाने पाण्याचे नियोजन केले त्यामुळे काहीअंशी करदात्यांना दिलासा मिळाला. नालासोपारा येथे ज्या धरणातून पाणी दिले जाते. ते आता कालबाह्य झाले आहे. या धरणातील पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे दर उन्हाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. १० वर्षापूर्वी या धरणाची डागडुजी करण्यात आली परंतु त्याचा फायदा मात्र होऊ शकला नाही. दुसरीकडे पाणीगळती व जलवाहिन्या तुटणे अशा दुहेरी अडचणी वाढत गेल्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होत गेला. पालघर तालुक्यात वीज वितरण व्यवस्थेत खेळखंडोबा होत असल्याने पूर्ण क्षमतेने पाणी उचलणे व त्याचे वितरण करणे कठिण होत आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी करण्यात आल्या. मात्र महावितरणच्या कारभारात अद्यापही सुधारणा झाली नाही. सूर्या प्रकल्प योजनेत वर्षभर पुरेल इतके पाणी असतानाही कर्मचाऱ्यांच्या धोरणामुळे नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.