Join us

के पश्चिम वॉर्ड, प्रभाग एकमध्ये सार्वजनिक गणपती योजना राबवा; सहायक आयुक्तांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 2:23 AM

महापालिका प्रशासनाची तयारी पूर्ण

- मनोहर कुंभेजकरमुंबई : गणेशोत्सव एक महिन्यावर आला आहे. गणेशभक्त या दिवसाची आतुरतेने वाट पाहात असतात. मात्र कोरोनामुळे गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. सध्या उद्भवलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय शासकीय स्तरावर घेण्यात आला असून, त्याबाबत मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या के पश्चिम वॉर्डमधील प्रभाग एकमध्ये सार्वजनिक गणपती योजना राबवा, असे आवाहन या वॉर्डचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आणि स्थानिक नागरिकांना केले आहे.

साडेसहा लाख लोकवस्ती असणाऱ्या के पश्चिम वॉर्डमधील प्रभाग एकमध्ये विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम व जोगेश्वरी पश्चिम हे तीन मोठे विभाग येतात. या वॉर्डमध्ये १५० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून दरवर्षी संकष्टीला विसर्जन होणारा आणि नवसाला पावणारा अंधेरीचा राजा हा या वॉर्डमध्ये येतो. दरवर्षी लाखो गणेशभक्त अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला येतात.

पर्यावरणाचे संवर्धन करून शाडूच्या मातीच्या मूर्ती, घरगुती आरास व इतर बाबींचा उपयोग करू. गणरायाच्या कृपेनेच कोरोनाचे सावट दूर होईल, अशी प्रार्थना करत साध्या पद्धतीने श्रीगणेशोत्सव साजरा करूया आणि एक प्रभाग एक सार्वजनिक गणपती योजना राबवूया. गणेशभक्तांनी कृत्रिम तलावातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन सहायक आयुक्त मोटे यांनी शेवटी केले आहे.

महापालिकेतर्फे पुरवण्यात येणाºया सुविधामहापालिकेतर्फे पुरेशा प्रमाणात कृत्रिम तलाव उभारणार.च्गृहनिर्माण सोसायटीच्या प्रवेशद्वारावरच गणेशमूर्ती स्वीकारण्याची सोय.च्नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना.च्निर्माल्यासाठी विशेष कुंडांची व्यवस्था.

टॅग्स :गणेशोत्सवमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस