स्मार्ट सोलर पॉवर निर्मिती पथदर्शी प्रकल्प कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:05 AM2021-02-10T04:05:57+5:302021-02-10T04:05:57+5:30

प्रदूषणविरहित पर्यावरणपूरक वीजनिर्मिती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : स्मार्ट सोलर पॉवर निर्मिती पथदर्शी पर्यावरणपूरक प्रकल्प नेट मिटरिंग व हायब्रीट ...

Implement smart solar power generation pilot project | स्मार्ट सोलर पॉवर निर्मिती पथदर्शी प्रकल्प कार्यान्वित

स्मार्ट सोलर पॉवर निर्मिती पथदर्शी प्रकल्प कार्यान्वित

Next

प्रदूषणविरहित पर्यावरणपूरक वीजनिर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : स्मार्ट सोलर पॉवर निर्मिती पथदर्शी पर्यावरणपूरक प्रकल्प नेट मिटरिंग व हायब्रीट सिस्टीम पारेषणरहित कार्यान्वित करण्यात आला आहे. ट्रान्समिशन इनटिटीमधील पहिला पथदर्शी प्रकल्प आहे. यामुळे कार्बन विसर्जन वर्षाकाठी ९७ हजार किलो वायू कमी होईल. प्रकल्पामुळे १२ ते १५ लाखांची वर्षाकाठी बचत करता येईल, असा दावा महापारेषणने केला आहे.

महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांच्या हस्ते हा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. चाकण ४०० के. व्ही. उपकेंद्रामध्ये गेली पाच वर्षे अभ्यास केला असता सर्वसाधारण प्रत्येक दिवशी वीजवापर सरासरी १३०० युनिट होत होता. यासाठी प्रत्येक महिन्याला सुमारे पाच लाखांचा खर्च येत होता. अभ्यास करून जुन्या पध्दतीचा लाईट या एलईडी लाईट विथ रियल टाईम कंट्रोलर प्रणालीमध्ये बसविली. वातानुकूलित यंत्रणामध्ये महत्त्वाचा घटक कॉम्प्रेसरमध्ये बदल तापमान हे २३ डिग्री सेल्सियसला ठेवले.

हा उपक्रम राबविल्यानंतर वीजबचत ३०० युनिट प्रति दिवस झाली. वीजवापर हा १३०० युनिट प्रति दिवस वरून साधारणतः १००० ते ११०० युनिट प्रति दिवस झाला. हे करत असताना सोलर पॉवर प्रकल्पावर अहवाल बनविला. त्याची प्रशासकीय मान्यता घेऊन महावितरण व मेडाकडून फिजिबिलीटी रिपोर्ट व प्रकल्प मान्यता घेऊन त्यांनी सुचविलेले बदल आपल्याकडे आवश्यकता लक्षात घेऊन केले. दरम्यान, या प्रकल्पासाठी लागणारी उपकरणे मागविण्यात आली.

प्रकल्प अहवालानुसार परतावा कालावधी हा सर्वसाधारण चार ते पाच वर्षे गृहित धरण्यात आला. परंतु, गुणवत्तापूर्ण सोलर पॅनल इनव्हर्टर जर्मनी, स्वीडन येथून आयात केलेले वापरले. सौरऊर्जा पॅनल हे ए क्वालिटी व उपयोगात येणाऱ्या केबल व स्वीचेस चांगल्या उत्पादकांकडून निवडल्या. त्यामुळे सर्वसाधारण ४५० ते ५०० युनिट प्रति दिवस वीजनिर्मिती होत आहे. या प्रकल्पातून होणारी वीजनिर्मिती साधारण ३ वर्षे ६ महिने हा कालावधी परतावा मिळण्यास निर्माण होत आहे.

------------------

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

-पर्यावरणपूरक प्रकल्प

-ट्रान्समिशन इनटिटीमधील पहिला प्रकल्प

- वर्षाला १२ ते १५ लाखांची बचत

-वीजबचतही होणार

-गुणवत्तापूर्ण उपकरणे

-अखंड विजेचा पुरवठा होणार

Web Title: Implement smart solar power generation pilot project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.