'एप्रिल फूल्स डे'शिवाय १ एप्रिलच्या 'या' घटनांनी घडवला इतिहास!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2018 02:53 PM2018-04-01T14:53:03+5:302018-04-01T14:54:40+5:30
'एप्रिल फूल्स डे'शिवाय १ एप्रिलला काही अत्यंत महत्त्वाच्या घटना घडल्यात आणि आज त्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेल्यात.
मुंबईः एक एप्रिल या दिवशी एखाद्याला मूर्ख बनवण्याची प्रथा फ्रान्सपासून सुरू होऊन आज जगभर पसरली आहे. आज सकाळपासून आपणही अनेकांना 'फूल' बनवलं असेल आणि कदाचित बनलाही असाल. पण 'एप्रिल फूल्स डे'शिवाय १ एप्रिलला काही अत्यंत महत्त्वाच्या घटना घडल्यात आणि आज त्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेल्यात.
>> आज कुणालाही ई-मेल अॅड्रेस विचारला की ९९ टक्के लोकांचा आयडी @gmail.com असा असतो. जगात दबदबा असलेल्या गुगलने जी-मेल ही आपली ई-पत्र प्रणाली १ एप्रिल २००४ रोजी सुरू केली होती. आज जी-मेलनं जग जिंकून घेतलंय.
>> भारतातील सर्व बँकांचं पालकत्व असलेल्या, पर्यायानं देशाचं अर्थकारण सांभाळणाऱ्या रिझर्व्ह बँकेची स्थापनाही १९३५ साली १ एप्रिललाच झाली होती.
>> १ एप्रिलपासून नवं आर्थिक वर्ष सुरू होतं. आर्थिक नियोजनाचा विचार केल्यास भारतीयांना पैकीच्या पैकी गुण द्यावे लागतील. कारण, पैशांची बचत करण्याची, सेव्हिंगची त्यांची सवय कौतुकास्पद आहे. ती ओळखूनच बहुधा पोस्टखात्याने याच दिवशी बचत सेवा योजना सुरू केली होती.
>> जगाला एकापेक्षा एक हायटेक उत्पादनं देणाऱ्या अॅपल या कंपनीने आपला पहिला कॉम्प्युटर १ एप्रिललाच लॉन्च केला होता.
>> कुठल्याही कामाला गती येण्यासाठी ऊर्जा किती आवश्यक आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. या ऊर्जानिर्मितीच्या दृष्टीनेही १ एप्रिलचं मोठं महत्त्व आहे. कारण भारतातील पहिलं अणुऊर्जा केंद्र १ एप्रिल १९६९ रोजी तारापूर येथे सुरू झालं होतं.