दिसेल शान ‘एनएसएस’ची!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 03:26 AM2020-01-21T03:26:55+5:302020-01-21T03:27:15+5:30

प्रत्येक एनएसएस वॉलेंटियरला आपल्या अनेक मित्र-मैत्रिणींकडून असे सल्ले मिळाले असतील. पण आता वेळ आलीये सर्वांना सांगायची की, ‘बॉस...

Importance of NSS | दिसेल शान ‘एनएसएस’ची!

दिसेल शान ‘एनएसएस’ची!

googlenewsNext

- रोहित नाईक 

कशाला एक्स्ट्रा दहा मार्क्ससाठी एनएसएस जॉइंट करायचं... आपण घरी कधी झाडू मारत नाही, कॉलेजमध्ये कोण मारणार? हेच करायला येतो का आपण कॉलेजमध्ये? पोलिसांसोबत आपण का काम करायचं? बरं एवढं सगळं करून आपल्याला मिळणार काय तर फक्त १० मार्क्स... त्यापेक्षा थोडी जास्त स्टडी करू आणि मस्त कॉलेज लाइफ एन्जॉय करू... यासारख्या प्रतिक्रियेपेक्षा एनएसएस नेमके कसे वेगळे आहे ?

प्रत्येक एनएसएस वॉलेंटियरला आपल्या अनेक मित्र-मैत्रिणींकडून असे सल्ले मिळाले असतील. पण आता वेळ आलीये सर्वांना सांगायची की, ‘बॉस... एनएसएस म्हणजे झाडू मारणं किंवा कचरा साफ करणं नाही... तर केवळ आपल्या कॉलेजचीच नव्हे, तर आपल्या पालकांचीही मान अभिमानानं उंचावण्याची एक मोठी संधी आहे.’

आपण सर्वांनीच लहानपणापासून २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतील राजपथ येथे होणाऱ्या आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सच्या विविध ग्रुप्सच्या शिस्तबद्ध परेड पाहिल्या आहेत. आजही आपण न चुकता या दिवशी दूरदर्शनपुढे बसतो... हा सोहळा पाहताना प्रत्येकालाच आपल्या भारताचा आणि आपण भारतीय असल्याचा अभिमान होतो... विचार करा, या दिवशी तुम्हाला राजपथवर परेड करण्याची संधी मिळाली तर?

नुसतं विचार करूनच अंगावर काटा उभा राहतो... आता तुम्ही म्हणाल, या परेडचा आणि एनएसएसचा काय संबंध? तर मित्रांनो तुम्ही यंदाही राजपथवर होणारी परेड पाहण्यास सज्ज झाला असाल, तेव्हा तिथे आपल्या एनएसएस ग्रुपची परेड पाहण्यासही विसरू नका... बसला ना शॉक... होय! आपली एनएसएसची पोरं राजपथवर प्रजासत्ताकदिनी परेड करणार आहेत आणि तेही आपल्या आर्म फोर्सच्या सोबतीनं... यंदाच्या परेडमध्ये आपल्या मुंबई युनिव्हर्सिटीचे पाच स्टुडंट्सही आहेत. आता बोला!

राजपथवर परेड करण्याची एनएसएसची ही पहिलीच वेळ नाही. १९८८ सालापासून सलग ३२व्या वर्षी एनएसएसचे वॉलेंटियर्स शिस्तबद्ध परेड करताना दिसतील. आता तरी पटलं असेलच की, एनएसएस म्हणजे नक्की काय आहे ते... आपण सर्व जण साधारणपणे एनएसएसच्या ज्या अ‍ॅक्टिव्हिटीज पाहतो, त्या सर्व ग्राऊंड लेव्हलच्या असतात. एनएसएस वॉलेंटियर्स मात्र यातून मिळणाºया अनेक संधींतून आपला व्यक्तिमत्त्व विकास साधतात. त्यामुळेच कॉलेज लाइफनंतर बाहेरच्या दुनियेत विविध क्षेत्रांमध्ये काम करताना एनएसएस वॉलेंटियर्सना फारशा अडचणी येत नाहीत.

एनआरडी... म्हणजे एनएसएस रिपब्लिक परेडसाठी तब्बल महिनाभर नवी दिल्ली येथे एनएसएसचा विशेष कॅम्प आयोजित होतो. यामध्ये देशभरातील विविध युनिव्हर्सिटीतील निवडक स्टुडंट्सचा समावेश असतो. दरवर्षी १ ते ३१ जानेवारी दरम्यान हा कॅम्प पार पडतो. सर्व राज्यांतील युवा या कॅम्पनिमित्ताने एका छताखाली येत असल्याने या कॅम्पदरम्यान ‘मिनी इंडिया’ असा रंग येतो.

यादरम्यान वॉलेंटियर्स दररोज तीन सत्रांमध्ये परेडची प्रॅक्टिस करतात आणि त्यासोबत त्यांना भारतातील सर्व राज्यांची संस्कृतीही अनुभवता येते. कॅम्पमधील प्रत्येक राज्याच्या मुलांना दुसºया राज्यातील मुलांसोबत राहण्यास सांगितलं जातं आणि यातून ते एकमेकांची संस्कृती, भाषा, राहणीमान जाणून घेतात. सर्वात रोमांचक बाब म्हणजे २६ जानेवारीला देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, देशाची तिन्ही सुरक्षा दलं, पोलीस दल, राजकीय मंडळी आणि देशबांधव या सर्वांसमोर दिमाखात परेड करण्याची मिळालेली संधी... आता वाटतंय ना, आपण पण एनएसएसमध्ये असायला हवं म्हणून... यानिमित्ताने एनआरडीमध्ये सहभागी झालेल्या मुंबई युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट्सशी आम्ही संवादही साधला आहे.

असा रंगतो कॅम्प...
कॅम्पचा प्रत्येक दिवस पहाटे ४ वाजता सुरू होऊन रात्री १०पर्यंत संपतो. यादरम्यान सर्व वॉलेंटियर्स परेड प्रॅक्टिस, श्रमदान, योगा,
शारीरिक व्यायाम, समूह गायन, व्याख्यान, चर्चासत्रं, प्रश्नोत्तरं, वादविवाद अशा विविध सत्रांमध्ये सहभाग घेतात. शिवाय रोज सायंकाळी रंगणाºया सांस्कृतिक कार्यक्रमांतून संपूर्ण भारताचं दर्शन घडविलं जातं. शिवाय वॉलेंटियर्सना विविध क्षेत्रांतील मान्यवरांसोबतच भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्याशी संवाद साधण्याचीही संधी मिळते.

एनएसएस परेडसाठी मी खूप उत्साहित आहे. या कॅम्पसाठी सिलेक्ट होण्याचा मला विश्वास होता. सिलेक्शनच्या वेळी आजारी असतानाही मी इथपर्यंत पोहोचली. पण त्याच वेळी नेहमी मला सोबत देणारा माझा मित्र सिलेक्ट झाला नाही, याची खंतही आहे. विविध राज्यांतील मुला-मुलींसोबत राहण्याचा अनुभव खूप वेगळा आहे. त्यांना आपल्या संस्कृतीमध्ये मोठा रस असून आपली लावणी सर्वांना आवडते. ‘वाजले की बारा’ हे गाणं सर्वांचं फेव्हरेट आहे. बहुतेक जण मराठी शिकण्याचा प्रयत्न करतात. सर्वात महत्त्वाचं माझ्या घरचे आनंदी आहेत. ते पहिल्यांदाच मला टीव्हीवर पाहतील.
- नितिशा कदम, एसआयईएस कॉलेज, शीव

या कॅम्पसाठी जाणारी मी माझ्या कॉलेजची पहिली स्टुडंट असून जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा खूप मस्त वाटलं. मी एका इंटरकॉलेज इव्हेंटमध्ये असताना या कॅम्पसाठी मी सिलेक्ट झाल्याची बातमी मिळाली. तेव्हा कशी रिअ‍ॅक्ट होऊ तेच कळत नव्हतं. शाळेत असताना नेहमी टीव्हीवर परेड पाहिली आहे आणि आता आम्ही येथे परेड करणार असल्यानं खूप भारी वाटतंय. राजपथवर उभं राहिल्यावर आपोआप उत्साह येतो. इथला अनुभव शब्दांत व्यक्त करता येणार नाही. एक गोष्ट नक्की की, एनएनएस आपण कल्पना नाही करू शकत इतकं मोठं आहे.
- संप्रिती जयंता, श्री भाऊसाहेब वर्तक कॉलेज, बोरीवली

एनएसएस जॉइंट केलं तेव्हा सर्व गोष्टी नवीन होत्या. सीनिअर्स आम्हाला सांभाळून घेत होते. त्यातून हळूहळू शिकत आज इथपर्यंत मजल मारली. याआधी माझ्या कॉलेजमधून आदर्श चौबे याची एनआरडीसाठी निवड झाली होती. त्याच्याकडून प्रेरणा घेत मीही या कॅम्पसाठी खूप मेहनत घेतली. आज माझ्या परिवारालाही अभिमान आहे याचा आनंद आहे. त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे यश मिळालं नसतं. आता पीएम, प्रेसिडेंट यांच्या भेटीची उत्सुकता असून, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेन.
- अक्षता कदम, ठाकूर कॉलेज, कांदिवली

देशभरातून विद्यार्थी येथे आल्याने मिनी इंडियाचा अनुभव घेतोय. आम्हाला येथे ओदिशा राज्यातील मुलांसोबत राहण्याची संधी मिळाली आहे. आम्ही एकमेकांची संस्कृती, भाषा, राहणीमान याची माहिती शेअर करतो. सांस्कृतिक कार्यक्रमांतून सर्वांची परंपरा जाणून घेता येते. आम्हीही इतर राज्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला. या कॅम्पचं वेळापत्रक बघताना खूप अवघड असल्याचं दिसतं, पण आम्ही यासाठीच येथे आलोय आणि सर्व जण एन्जॉय करत आहोत. आमच्यासाठी ही मिळालेली सर्वात मोठी संधी आहे.
- पार्थ जानी, विवा कॉलेज, विरार

एनएसएसमध्ये आल्यापासून राजपथवर परेड करण्याचं माझं स्वप्न होतं. एनएसएसचे अनेक कॅम्प अनुभवले, पण एनआरडीची गोष्टच वेगळी आहे. या सर्व वाटचालीत शिक्षकांसोबतच माझ्या सीनिअर्सकडूनही खूप मदत मिळाली. एनएसएस इतकं मोठ्या स्तरावर काम करत असेल याची अजिबात कल्पना नव्हती. २४० तास पूर्ण करायचे, सर्टिफिकेट मिळवायचं इतकीच माहिती होती. परेडची प्रॅक्टिस करण्याचा अनुभव जबरदस्त आहे. बाहेरच्या राज्यांतील मुलांना महाराष्ट्राच्या संस्कृतीबाबत खूप उत्सुकता आहे. तसंच आम्हालाही इतर राज्यांचीही संस्कृती अनुभवता आली.
- प्रशांत चौधरी, केसी कॉलेज, चर्चगेट

Web Title: Importance of NSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.