Join us  

महत्त्वाची ४१ पदे रिक्त

By admin | Published: March 21, 2015 10:52 PM

पालघर जिल्ह्णातील अतिदुर्गम ९२ टक्के आदिवासी तालुका असलेल्या १,७०,००० हजार लोकसंख्येला केवळ चार प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत.

जव्हार : पालघर जिल्ह्णातील अतिदुर्गम ९२ टक्के आदिवासी तालुका असलेल्या १,७०,००० हजार लोकसंख्येला केवळ चार प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. जामसर, साकुर, नांदगाव व साखरशेत या ठिकाणी प्रा. आ. केंद्र तर चांभारशेत, वावर, दाभेरी व झाप येथे आरोग्य पथके आहेत. लोकसंख्या जरी एक लाख सत्तर हजार असली तरी क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा तर भौगोलीक दृष्ट्या दऱ्याखोऱ्यात, गावपाड्यात आदिवासी समाज विरळ लोकवस्ती करून राहतो. गर्भवती, वृद्ध, कुपोषीत बालके व गंभीर रूग्णांना तातडीने आरोग्य सुविधा मिळत नसल्यामुळे अनेक रूग्णांना आपले प्राण गमवावे लागत असल्याच्या घटना वारंवार घडत असतात.या भागात आरोग्याशी निगडित अनेक प्रमुख समस्या आहेत. तसेच जव्हार तालुक्यातील पंचायत समिती तालुका आरोग्य कार्यालयाअंतर्गत १६९ पैकी ४१ महत्वाची पदे रिक्त असल्याची धक्कादायक नवनिर्वाचित सभापती ज्योती भोये व उपसभापती सिताराम पागी यांना समजताच त्यांनी तातडीने रिक्तपदे भरण्याबाबत पालघर जिल्हाधिकारी, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे तसेच आरोग्य मंत्री दिपक सावंत यांच्याकडे समक्ष जावून पाठपुरावा करू. तसेच रिक्तपदाव्यतिरीक्त आरोग्यासंदर्भातील समस्या जव्हार पंचायत समिती कार्यालयामार्फत सोडविल्या जातील असे प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले. (वार्ताहर)पदरिक्तपदेतालुका आरोग्य अधिकारी१वैद्यकीय अधिकारी गट (ब)२विस्तार अधिकारी१आरोग्य सहाय्यक (पुरूष) राज्य२आरोग्य सहाय्यक (स्त्री) राज्य३औषध निर्माण अधिकारी२आरोग्य सेवक४आरोग्य सेविका५वाहन चालक६शिपाई९सफाई कामगार६एकुण मंजुर पदे - १६९, भरलेली पदे १२८, रिक्तपदे- ४११९९३ च्या कुपोषीत बालमृत्युकांडामुळे जव्हार तालुक्यात, राज्यात, देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर दखल घेतली जावून युतीमध्ये जव्हार तालुका कुपोषणमुक्तीसाठी प्रयत्न करण्याबाबत उपाययोजना सुचविल्या गेल्या. तळागाळातील सामान्य नागरीक व प्रशसनाजवळ आल्यास जव्हार तालुक्याच्या विकासासाठी व सामान्य नागरीकांना कमीत कमी पायाभुत सुविधा मिळाव्यात म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी जव्हारला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणून प्रत्येक विभागाचे विभागीय कार्यालये जव्हार येथे आणले खरे परंतु राजकीय इच्छा शक्तीचा अभाव व अधिकारीवर्ग जव्हार सारख्या दुर्गम भागात येण्यास नाखुश असतात जे येतात त्यांना मनापासुन काम करण्याची इच्छा नसल्याने गेल्या २२ वर्षात परिस्थितीत काहीच बदल घडला नाही. दरवर्षी कुपोषणामुळे बालमृत्यू, आरोग्य सुविधांचा अभाव यामुळे जव्हार चर्चेत राहतच असते.जव्हार हा आदिवासी विकासमंत्री विष्णु सवरा यांच्या मतदार संघातील तालुका. निवडणुक प्रचारादरम्यान आश्वासनांची खैरात करणाऱ्या सवरा यांनी निवडून आल्यानंतर तसेच मंत्रीपद मिळाल्यानंतर सत्कार समारंभ व पक्षीय कार्यक्रमाव्यतिरीक्त एकही शासकीय दौरा केला नाही अथवा मतदारसंघाच्या विकासासंदर्भात, समस्या संदर्भात एकही आढावा बैठक घेतली नसल्यामुळे प्रत्येक विभागातील समस्या जैसे थे आहेत.