Join us

पर्यावरण विभागाच्या नामांतरासह राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 6:31 PM

राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज पार पडली असून, या बैठकीत राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज पार पडली असून, या बैठकीत राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये पर्यावरण विभागाचे नाव बदलून " पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग" असे करण्याचा मह्त्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. याशिवाय, मराठवाड्यातील पाच कौटुंबिक न्यायालयांना पाच वर्षांसाठई मंजुरी तसेच वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथे पंचतारांकित पर्यटन केंद्रासाठी जमीन उपलब्ध करून देण्यासह इतर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय पुढीलप्रमाणे

 

1. शासकीय कला महाविद्यालयांमधील 159 अध्यापकांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता

2. मराठवाड्यातील 5 कौटुंबिक न्यायालयांना पुढील 5 वर्षांसाठी मंजुरी

3. वेंगुर्ला येथील मौजे शिरोडा वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्यास ताज ग्रुपच्या इंडियन हॉटेल्स कंपनी याना 54.40 हे.आर. जमीन भाडेपट्ट्यावर 

4. पर्यावरण विभागाचे नाव बदलून " पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग" असे करण्याचा निर्णय 

5. ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय कंपन्यांच्या कर्जाला शासन हमी

टॅग्स :महाराष्ट्र सरकारमहाराष्ट्रमुंबई