Join us

पुणे - छ. संभाजीनगर महामार्गाची सुधारणा, नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा...; राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 4:58 PM

राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Maharashtra Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत महायुती सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत एकूण ११ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातही महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तब्येतीच्या कारणास्तव उपमुख्यमंत्री अजित पवार आणि फडणवीस प्रत्यक्ष उपस्थित नव्हते. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीला ऑनलाईन हजेरी लावली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत काटोल, आर्वी येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय. पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालयाची उभारणी तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबत विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पुणे - छत्रपती संभाजीनगर महामार्गाची सुधारणा करण्याचा महत्त्वाचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

पुणे - छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार

अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार

शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान

अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार. ३६ हजारापेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार

औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते

थकीत देणी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ

धारूर तालुक्यातील सुकळी गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार

काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय

हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा

महत्त्वाच्या घोषणा

लाडकी बहिणी योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत.

शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: सुमारे १ कोटी ६० लाख भगिनींना ४७८७ कोटींचे वाटप

राज्यात १२१ टक्के पेरण्या

राज्यातील मोठी धरणे २०१८ नंतर प्रथमच शंभर टक्के भरली

टॅग्स :महाराष्ट्र सरकारएकनाथ शिंदेलाडकी बहीण योजनेचा