सीडीसाठी महत्त्वाची माहिती.....

By admin | Published: June 12, 2015 05:37 PM2015-06-12T17:37:59+5:302015-06-12T17:37:59+5:30

Important information for CDs ..... | सीडीसाठी महत्त्वाची माहिती.....

सीडीसाठी महत्त्वाची माहिती.....

Next
>सीडीसाठी महत्त्वाची माहिती...
..........................................
मुंबईत दीड हजार चायनीज विक्रेते
मुंबई शहर आणि उपनगरात मिळून दीड हजार ते अठराशे चायनीज खाद्यपदार्थ विक्रेते असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभाग आणि महापालिकेकडे चायनीजच्या गाड्यांची वेगळी अशी नोंद केलेली नाही. रस्त्यावर अन्न पदार्थ विकणार्‍यांवर मात्र एफडीएतर्फे कारवाई केली जाते. एफडीएचे अन्न अधिकारी या गाड्यांवर थेट कारवाई करतात. एखाद्या ठिकाणची तक्रार आल्यास अथवा त्यांना संशय आल्यास ही कारवाई होते. पहिल्यांदा त्या विक्रेत्यांना नोटीस पाठविली जाते. पण, तरीही सुधारणा न केल्यास त्यांना २५ हजारांपर्यंत दंड आकारला जातो. रस्त्यावरील अन्न विक्रेत्यांचे उत्पन्न दरवर्षी १२ लाखांच्या वर असल्यास त्यांना अधिकृत परवाना देण्यात येतो. अशाप्रकारे आत्तापर्यंत ३६ हजार विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांना एफडीएने परवाने दिले आहेत. तर, ७६ हजार विक्रेत्यांची एफडीएकडे नोंदणी आहे. पैकी केवळ चायनीजच्या गाड्यांचा विचार करता ही संख्या १५०० ते १८०० दरम्यान असण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली.

Web Title: Important information for CDs .....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.