महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची महत्वाची बैठक, पदाधिकाऱ्यांना शिवतीर्थवर पाचारण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 11:52 AM2022-02-10T11:52:35+5:302022-02-10T11:53:12+5:30
Maharashtra Navnirman Sena: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मनसेच्या विविध समित्यांचे अध्यक्ष निवडले जाण्याची शक्यता आहे.
मुंबई - आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मनसेच्या विविध समित्यांचे अध्यक्ष निवडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे BMC निवडणुकीची जबाबदारी राज ठाकरे कुणाच्या खांद्यावर देणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
राज ठाकरेंनी दिले होते तयारीला लागण्याचे आदेश
या पूर्वी 2 फेब्रुवारीला वरळीतीळ MIG क्रिकेट क्लब मध्ये झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागण्याचे आदेश दिले होते. व कोणतीही वायफळ चर्चा न करता प्रभाग बांधणीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते.
युतीवर चर्चा नको
इतर पक्ष निवडणुकीच्या तयारीला मनसे भाजप सोबत युती करणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या त्यावर राज ठाकरे यांनी "युती होईल कि नाही ते पुढे बघू पण तुमची स्वतंत्र लढण्याची तयारी असली पाहिजे. तुम्ही युतीच्या चर्र्चेत पढू नका. निवडणुकीच्या अनुसंघाने कामाला लागा. विधानसभा वार कमिटी नेमली जाणार मग ही कमिटी अहवाल तयार करणार आहे." असं म्हटलं होतं.
दरम्यान, 2 तारखेला स्थापन केलेल्या या समित्यांवर आज अध्यक्ष नेमण्यात येणार असून राज ठाकरे ही जबाबदारी नेमकी कुणाच्या खांद्यावर देणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.