प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 06:50 AM2024-11-16T06:50:57+5:302024-11-16T06:50:57+5:30
पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तसेच अप आणि डाउन हार्बर मार्गावर १२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी, पश्चिम रेल्वे मार्गावर गर्डर उभारणीच्या कामासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर रविवारी सकाळी ११: ०५ ते दुपारी ३: ५५ या कालावधीत, तर हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर सकाळी ११:१० ते ४:१० या कालावधीत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
हार्बर मार्गावरील ब्लॉक कालावधीत सकाळी १०: ३४ ते दुपारी ३:३६ पर्यंत सीएसएमटीवरून सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेल डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशीसाठी सकाळी १०:१६ ते दुपारी ३:४७ वाजेपर्यंत सुटणाऱ्या सीएसएमटीसाठी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. या कालावधीत सीसीएसएमटी ते कुर्ला आणि कुर्ला ते पनवेल/वाशी दरम्यान विशेष सेवा चालविण्यात येणार आहेत.
१२ तासांचा ब्लॉक
पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तसेच अप आणि डाउन हार्बर मार्गावर १२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शनिवारी मध्यरात्री ११:३० ते रविवारी सकाळी ११: ३० या कालावधीत घेतला जाणार आहे.
राम मंदिर स्टेशनवर
ट्रेन थांबणार नाही
पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले की अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सेवा अंधेरी आणि गोरेगाव/बोरिवली दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर चालवल्या जाणार असल्याने राम मंदिर स्थानकात कोणत्याही गाड्या थांबणार नाहीत.