मुंबई : मध्य रेल्वे रविवारी ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत, तसेच कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वेवरील ब्लॉक दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील गाड्या वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहेत. मध्यरेल्वेवर ब्लॉकनंतर डाऊन धीम्या मार्गावर पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दुपारी ३.०५ वासता सुटेल, तर अप धीम्या मार्गावर ब्लॉकनंतरची पहिली ठाणे येथून सायंकाळी ०४.१७ वाजता सुटेल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कुर्ला आणि पनवेल- वाशी या भागांवर विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येतील. त्यासोबतच ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे- वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.
गाड्या जलद मार्गावर
१) पश्चिम रेल्वेमार्गावर गोरेगाव ते कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी अप आणि डाऊन धीम्या व डाऊन फास्ट मार्गावर शनिवारी मध्यरात्री १२ ते रविवारी सकाळी १० या कालावधीत मेजर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
२) ब्लॉक कालावधीत बोरिवली ते गोरेगाव अप धीम्या मार्गावरील सर्व गाड्या जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत. तसेच या स्थानकांदरम्यान या डाऊन स्लो मार्गावरील गाड्या पाचव्या मार्गावर धावतील आणि प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे, ब्लॉक कालावधीत या गाड्या राम मंदिर, मालाड आणि कांदिवली स्थानकावर थांबणार नाही आहेत.