प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: मुंबईतील मुसळधार पावसामुळे 'या' ५ एक्स्प्रेस ट्रेन रद्द 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 09:02 AM2024-07-08T09:02:01+5:302024-07-08T09:06:02+5:30

पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला असून लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.

Important news for passengers 5 express train canceled due to heavy rains in Mumbai  | प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: मुंबईतील मुसळधार पावसामुळे 'या' ५ एक्स्प्रेस ट्रेन रद्द 

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: मुंबईतील मुसळधार पावसामुळे 'या' ५ एक्स्प्रेस ट्रेन रद्द 

Mumbai Rain Updates ( Marathi News ) : राजधानी मुंबईत रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. या पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला असून लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. तसंच मध्य रेल्वेकडून आज पाच एक्स्प्रेस ट्रेनही रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुण्याहून मुंबईकडे धावणाऱ्या तीन रेल्वे गाड्या, तसंच मुंबईहून पुण्याकडे धावणारी एक गाडी आणि मनमाडहून मुंबईकडे येणाऱ्या एका गाडीचा समावेश आहे.

कोणत्या रेल्वे गाड्या झाल्या रद्द?

१. १२११० - पंचवटी एक्स्प्रेस
२. ११०१०  - पुणे -सीएसएमटी- सिंहगड एक्स्प्रेस
३. १२१२४ - पुणे- सीएसएमटी- डेक्कन एक्स्प्रेस
४. ११००७ - पुणे - सीएसएमटी- डेक्कन एक्स्प्रेस
५. १२१२७ - सीएसएमटी-पुणे - इंटरसिटी एक्स्प्रेस

पावसाने मुंबईला झोडपलं, कुठे किती पाऊस?

मुंबई शहर आणि उपनगरांत दिनांक ८ जुलै २०२४ रोजी मध्यरात्री १ वाजेपासून सकाळी ७ वाजेदरम्यान सर्वाधिक पाऊस कोसळलेली ठिकाणे आणि पावसाचे प्रमाण.
 
- वीर सावरकर मार्ग महानगरपालिका शाळा (३१५.६ मिमी)

- एमसीएमसीआर पवई (३१४.६ मिमी)

- मालपा डोंगरी महानगरपालिका शाळा (२९२.२ मिमी)

- चकाला महानगरपालिका शाळा (२७८.२ मिमी)

- आरे वसाहत महानगरपालिका शाळा (२५९.० मिमी)

- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महानगरपालिका शाळा (२५५.० मिमी)

- नारीयलवाडी शाळा (२४१.६ मिमी)

- जिल्हाधिकारी वसाहत (कलेक्टर कॉलनी) महानगरपालिका शाळा (२२१.२ मिमी)

- प्रतीक्षानगर महानगरपालिका शाळा (२२०.२ मिमी)

- नूतन विद्यामंदिर (१९०.६ मिमी)

- लालबहादूर शास्त्री मार्ग महानगरपालिका शाळा (१८९.० मिमी)

- शिवडी कोळीवाडा महानगरपालिका शाळा (१८५.८ मिमी)

- रावळी कॅम्प (१७६.३ मिमी)

- धारावी काळा किल्ला महानगरपालिका शाळा (१६५.८ मिमी)

- बी. नाडकर्णी उद्यान महानगरपालिका शाळा (१५६.६ मिमी)
 

Web Title: Important news for passengers 5 express train canceled due to heavy rains in Mumbai 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.