Join us

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: मुंबईतील मुसळधार पावसामुळे 'या' ५ एक्स्प्रेस ट्रेन रद्द 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 9:02 AM

पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला असून लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.

Mumbai Rain Updates ( Marathi News ) : राजधानी मुंबईत रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. या पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला असून लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. तसंच मध्य रेल्वेकडून आज पाच एक्स्प्रेस ट्रेनही रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुण्याहून मुंबईकडे धावणाऱ्या तीन रेल्वे गाड्या, तसंच मुंबईहून पुण्याकडे धावणारी एक गाडी आणि मनमाडहून मुंबईकडे येणाऱ्या एका गाडीचा समावेश आहे.

कोणत्या रेल्वे गाड्या झाल्या रद्द?

१. १२११० - पंचवटी एक्स्प्रेस२. ११०१०  - पुणे -सीएसएमटी- सिंहगड एक्स्प्रेस३. १२१२४ - पुणे- सीएसएमटी- डेक्कन एक्स्प्रेस४. ११००७ - पुणे - सीएसएमटी- डेक्कन एक्स्प्रेस५. १२१२७ - सीएसएमटी-पुणे - इंटरसिटी एक्स्प्रेस

पावसाने मुंबईला झोडपलं, कुठे किती पाऊस?

मुंबई शहर आणि उपनगरांत दिनांक ८ जुलै २०२४ रोजी मध्यरात्री १ वाजेपासून सकाळी ७ वाजेदरम्यान सर्वाधिक पाऊस कोसळलेली ठिकाणे आणि पावसाचे प्रमाण. - वीर सावरकर मार्ग महानगरपालिका शाळा (३१५.६ मिमी)

- एमसीएमसीआर पवई (३१४.६ मिमी)

- मालपा डोंगरी महानगरपालिका शाळा (२९२.२ मिमी)

- चकाला महानगरपालिका शाळा (२७८.२ मिमी)

- आरे वसाहत महानगरपालिका शाळा (२५९.० मिमी)

- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महानगरपालिका शाळा (२५५.० मिमी)

- नारीयलवाडी शाळा (२४१.६ मिमी)

- जिल्हाधिकारी वसाहत (कलेक्टर कॉलनी) महानगरपालिका शाळा (२२१.२ मिमी)

- प्रतीक्षानगर महानगरपालिका शाळा (२२०.२ मिमी)

- नूतन विद्यामंदिर (१९०.६ मिमी)

- लालबहादूर शास्त्री मार्ग महानगरपालिका शाळा (१८९.० मिमी)

- शिवडी कोळीवाडा महानगरपालिका शाळा (१८५.८ मिमी)

- रावळी कॅम्प (१७६.३ मिमी)

- धारावी काळा किल्ला महानगरपालिका शाळा (१६५.८ मिमी)

- बी. नाडकर्णी उद्यान महानगरपालिका शाळा (१५६.६ मिमी) 

टॅग्स :रेल्वेपाऊसमुंबई मान्सून अपडेटहवामानरेल्वे प्रवासी