Join us

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: आज शेवटची कर्जत ११:५१ वाजता; कल्याण-वांगणी दरम्यान रात्री ट्रॅफिक ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 05:57 IST

Mumbai Local Block Today: ब्लॉकपूर्वी कर्जत येथे जाणारी शेवटची लोकल सीएसएमटी येथून रात्री ११:५१ वाजता सुटेल आणि कर्जत येथे १:४९ वाजता पोहोचेल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

मुंबई : कल्याण आणि वांगणी दरम्यान एफओबीचे मुख्य गर्डर उभारणीसाठी मध्य रेल्वे शनिवारी रात्री विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शेवटची कर्जत लोकल ११:५१ वाजता सीएसएमटीतून सुटणार आहे. कल्याण आणि वांगणी दरम्यान एफओबीचे मुख्य गर्डर उभारणीसाठी विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्यरात्री १:३० ते ३:३० या कालावधीत दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

एकूण ३ ठिकाणी गर्डर उभारले जाणार आहे. ब्लॉक कालावधीत कल्याण आणि कर्जत विभागादरम्यान उपनगरीय सेवा बंद असणार आहे. त्यामुळे ब्लॉकपूर्वी कर्जत येथे जाणारी शेवटची लोकल सीएसएमटी येथून रात्री ११:५१ वाजता सुटेल आणि कर्जत येथे १:४९ वाजता पोहोचेल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

पश्चिम रेल्वे विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबापश्चिम रेल्वेची डाऊन धीमी मार्गावर शुक्रवारी दुपारी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यानची वाहतूक वीस मिनिटे ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशांनी ट्रॅकवरून चालत जाण्याचा पर्याय निवडला. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान दुपारी ३:२८ ते ३:५१ या कालावधीत विरारच्या दिशेने जाणारी डाऊन धीमी मार्गिका ठप्प झाली होती. दुपारी मुंबई सेंट्रल कारशेडच्या दिशेने जाणारी लोकल महालक्ष्मी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म एकवरून जात असताना तिच्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती एकाच ठिकाणी अडकून पडली.

उद्या प्रवासात रखडपट्टीरविवारी मुंबई लोकलवर १ मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर तर पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी आणि कांदिवली स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सकाळी ११.३० ते • दुपारी ३.३० वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटीवरून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवल्या जातील. यामुळे लोकल १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी आणि 3 कांदिवली स्थानकांदरम्यान ५व्या मार्गावर सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या कालावधीत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत वांद्रे टर्मिनस वरून सुटणाऱ्या सर्व मेल अंधेरी आणि बोरीवली दरम्यान डाऊन जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत.

टॅग्स :मुंबई लोकल मेगा ब्लॉकमुंबई लोकलमुंबईमध्य रेल्वेकल्याणकर्जत