म्युझिक कंपन्यांवर छापे; मनी लाँडरिंगचे आरोप, हवालामार्गे परदेशांत पैसे वळवले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 03:06 AM2017-11-04T03:06:47+5:302017-11-04T03:07:11+5:30

बोगस कंपन्या स्थापन करून, मनी लाँडरिंग केल्याच्या आणि गायकांची रॉयल्टी न दिल्याच्या तक्रारीनंतर सक्तवसुली संचालनालयाने शुक्रवारी पाच बड्या कंपन्यांवर छापे घातले.

Impressions on music companies; Money laundering charges, money transfer abroad? | म्युझिक कंपन्यांवर छापे; मनी लाँडरिंगचे आरोप, हवालामार्गे परदेशांत पैसे वळवले?

म्युझिक कंपन्यांवर छापे; मनी लाँडरिंगचे आरोप, हवालामार्गे परदेशांत पैसे वळवले?

googlenewsNext

मुंबई : बोगस कंपन्या स्थापन करून, मनी लाँडरिंग केल्याच्या आणि गायकांची रॉयल्टी न दिल्याच्या तक्रारीनंतर सक्तवसुली संचालनालयाने शुक्रवारी पाच बड्या कंपन्यांवर छापे घातले. या कंपन्यांचे हिशेब तपासणे हे त्याचे कारण होते, असे सांगण्यात आले असले तरी या छाप्यांमुळे पाचही कंपन्या हादरून गेल्या आहेत.
टी सीरिज, सारेगम, युनिव्हर्सल, सोनी व यशराज अशी या म्युझिक कंपन्यांची नावे आहेत. या छाप्यांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीतही खळबळ उडाली आहे. प्रख्यात गायिका शुभा मुदगल यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे. या कंपन्या गायकांना त्यांची रॉयल्टी व कॉपीराइटनुसार रक्कम देत नाहीत, अशी तक्रार त्यांनी केल्याचे बोलले जाते. मात्र त्यास दुजोरा मिळू शकला नाही.
ईडीने गेल्या वर्षी मार्च महिन्यात गीतकार आणि संगीतकारांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे इंडियन परफॉर्मिंग राइट सोसायटी लिमिटेड (आयपीआरएस) या प्रमुख संघटनेविरोधात पीएमएलए
प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे, असे सांगण्यात आले.
या पाचही म्युझिक कंपन्यांच्या आर्थिक व्यवहाराविषयीही अनेक तक्रारी होत्या. बोगस कंपन्या स्थापन करून, त्यांनी मोठ्या रकमा परदेशात पाठवल्या,
असाही एक आरोप आहे. त्यामुळे फेरा (फॉरेन एक्स्चेंज रेग्युलेशन अ‍ॅक्ट) तसेच मनी लाँडरिंगबद्दल पीएमएलए (प्रीव्हेंशन आॅफ मनी लाँडरिंग अ‍ॅक्ट) खाली हे छापे घालण्यात आल्याचे ईडीच्या एका अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. ईडीने म्युझिक
कंपन्यांच्या मुंबईबरोबरच कोलकाता व दिल्लीमधील कार्यालयांवर छापे मारल्याचे अधिका-याने सांगितले. सुमारे ५0 अधिका-यांनी हे छापे घातले.

बडे मासे अडकण्याची शक्यता
छाप्यांमध्ये ईडीने या म्युझिक कंपन्यांच्या कार्यालयांतून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. या छाप्यांमुळे म्युझिक कंपन्यांमधील बडे मासे अडकण्याची शक्यता ईडीच्या वरिष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
या प्रकरणी ईडीकडून अधिक तपास सुरू असून, चित्रपट निर्मितीमधील कंपन्यांचीही यातील माहितीच्या आधारे चौकशी होईल, असे कळते.

Web Title: Impressions on music companies; Money laundering charges, money transfer abroad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.